swabhimani shetkari sanghatana rasta roko andolan at nagpur amravati highway saam tv
महाराष्ट्र

Rasta Roko Andolan : आंदाेलन चिघळलं... नांदगावपेठ टोल नाक्यावर 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते अन् पाेलिसांत झटापट

या आंदोलनात सोयाबीन, कापूस, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग हाेता. हे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनकर्ते आक्रमक झाले हाेते.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News :

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज (गुरुवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने (swabhimani shetkari sanghatana) नागपूर अमरावती महामार्गावर रास्ता राेकाे (rasta roko at nagpur amravati highway) करण्यात आला. या आंदाेलनामुळे या महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली. दरम्यान पाेलिसांनी काही आंदाेलकांना ताब्यात घेतल्याने महामार्गावर आंदाेलक आणि पाेलिसांत झटापट देखील झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी. सोयाबीनला खाजगी बाजारात प्रतिक्विंटल आठ हजार रुपये भाव मिळावा, कापसाला खाजगी बाजारात प्रती दहा हजार रुपये क्विंटल भाव स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे अशी मागणी शेतक-यांनी घाेषणाबाजी करुन केली. अमरावती जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारावी, मागील वर्षीचा आणि चालू वर्षाचा शंभर टक्के पिक विमा द्यावी अशी मागणी देखील शेतक-यांनी केली.

नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपेठ टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेकडाे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदाेलन छेडले. या आंदोलनात सोयाबीन, कापूस, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग हाेता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

No salt diet: सलग 15 दिवस मीठ खाल्लं नाही तर काय होईल, जाणून घ्या

IPL 2026: मुंबईचा शेवटचा सामनाही देवाला, राजस्थानची प्लेऑफमध्ये रॉयल एन्ट्री, पंजाब-कोलकात्याचा खेळ खल्लास

Maharashtra News Live Update: चांदवड-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; वाहन उलटून २१ मजूर जखमी

Fitness Influencer Death: फिटनेस इन्फ्लुएंसरचे वयाच्या 22 व्या वर्षी निधन; चाहत्यांना बसला मोठा धक्का

नदीत पात्रात अचानक पाणी वाढले; बोटीने शिंपले गोळा करायला गेलेल्या ८ जणांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT