Raju Shetty Aakrosh Padyatra Saam Digital
महाराष्ट्र

Raju Shetty Aakrosh Padyatra: राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला पुन्हा सुरुवात

Raju Shetti Aakrosh Padyatra: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राजू शेट्टी यांनी सुरू केलेली आक्रोश यात्रा 30 ऑक्टोंबर रोजी स्थगिती केली होती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raju Shetty Aakrosh Padyatra

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राजू शेट्टी यांनी सुरू केलेली आक्रोश यात्रा 30 ऑक्टोंबर रोजी स्थगिती केली होती. मात्र सांगलीच्या जयंत पाटील यांच्या राजाराम बापू कारखान्यापासून राजू शेट्टींनी पुन्हा आक्रोश यात्रेस सुरुवात केली आहे. दुसरा हप्ता ४०० रुपये द्या या मागणीचे निवेदन कारखाना प्रशासनाला देत यात्रेला सुरवात करण्यात आली.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ कारखाने आहेत. या कारखान्यांनी ३ कोटी टन उसाचे प्रती टन ४०० रुपये प्रमाणे बाराशे कोटी देणे बाकी आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रोश पद यात्रेचे आयोजन केले आहे. शिरोळमधून १७ ऑक्टोबर रोजी पदयात्रेला सुरुवात झाली होती. १४ दिवसांमध्ये शिरोळ ते शाहूवाडी पर्यंत ३०० किमीपेक्षा अधिक पदयात्रा पूर्ण झाली. या यात्रेला शेतकऱ्यांमधूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात आली होती. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या आंदोलनालाही फटका बसला होता. त्यामुळे राजू शेट्टी यांनी आंदोलन स्थगित करत मराठा आंदोलनाला पाठिंबा दिली होता. आता मराठा आंदोलन स्थगित झाल्यामुळे पुन्हा आक्रोश यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT