Nashik News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील (Swabhimani Shetkari Sanghatana) अंतर्गत वाद अद्याप मिटलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे कार्यपद्धतीवर नाराज असून ते लवकरच दुसरा गट स्थापन करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत.
रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींवर अनेक आक्षेप घेतले आहेत. या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी आता संघटनेकडून महत्वाची पाऊलं उचलली जात आहेत. अशामध्ये येत्या २६ ऑगस्टला रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांना समोरासमोर बोलवण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे सदस्य संदीप जगताप यांनी दिली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अंतर्गत वादाप्रकरणी समितीचे सदस्य संदीप जगताप यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, 'येत्या २६ ऑगस्टला कोल्हापूर येथे रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांना समोरासमोर बोलवण्यात येणार आहे. अंतर्गत वाद मिटवण्यासाठी २६ ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे.' तसंच, 'पक्षाचा अंतर्गत वाद मिटला पाहिजे. संघटना एकसंघ राहावी, अशी संदीप जगताप यांची भूमिका आहे.
रविकांत तुपकर यांनी १५ ऑगस्ट रोजी समितीला पत्र पाठवले होते. त्यात तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर आक्षेप घेतले होते. या आक्षेपावर राजू शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र दोघेही समोरासमोर येत नसल्याने दोघांना समजून घेणे अवघड असल्याचे संदीप जगताप यांनी सांगितले. अशामध्ये आता संघटनेकडून या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी २६ ऑगस्टही अंतिम तारीख ठरवली आहे. या दिवशी तरी दोघे समोरासमोर येऊन वाद मिटवतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sagnhtana) शिस्तपालन आणि कोअर कमिटीची पुण्यामध्ये बैठक झाली होती. या बैठकीला राजू शेट्टींनी हजेरी लावली होती. तसंच त्यांनी आपले म्हणणे मांडले होते. पण रविकांत तुपकर या बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे या बैठकीमध्ये रविकांत तुपकर यांना १५ ऑगस्टपर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत देण्यात आली होती.
त्यानंतर रविकांत तुपरकर यांनी १५ ऑगस्टला समितीला पत्र पाठवूत उत्तर दिले होते. या पत्रमध्ये त्यांनी राजू शेट्टींवर आरोप केले होते. अशामध्ये आता २६ तारखेला या दोन्ही नेत्यांची समोरासमोर बैठक होणार आहे. त्यामध्ये नेमकं काय होतंय ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.