Mathura Crime News: हृदयद्रावक! साधूच्या वेशात आला, अन् ५ वर्षांच्या चिमुकल्याची रस्त्यावर आपटून केली हत्या; उत्तर प्रदेश हादरलं

5 Years Old Boy Killed By Monk: मथुरामध्ये शनिवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी साधूला पकडून बेदम मारहाण केली.
Mathura Crime News
Mathura Crime NewsSaam Tv
Published On: 

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मथुरामध्ये (Mathura) हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ५ वर्षांच्या मुलाची रस्त्यावर आपटून आपटून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. साधूच्या वेशामध्ये आलेल्या व्यक्तीने घराबाहेर खेळणाऱ्या या चिमुकल्याचा जीव घेतला.

मथुरामध्ये शनिवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी साधूला पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जमावाच्या तावडीतून आरोपी साधूची सुटका करत त्याला रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर स्थानिकांनी रास्तारोको करत आंदोलन केले.

Mathura Crime News
Father Cut Teacher Finger: मुलीला शाळा साफ करायला सांगितल्याने वडिलांचा संताप; कडाडून चावा घेत शिक्षकाचं बोट तोडलं

मिळालेल्या माहितीनुसार, मथुराच्या गोवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राधाकुंड येथील गोपाळ घाटावर चिमुकल्याच्या हत्येची ही धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. राधाकुंड येथील कुम्हार मोहल्ला येथील रहिवासी हरपाल यांचा पाच वर्षांचा मुलगा अंकित हा घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या गोपाल कुंडजवळ खेळत होता. त्याचवेळी त्या ठिकाणी साधूच्या वेशामध्ये एक व्यक्ती आली. त्याने अंकितला आपल्या जवळ बोलावून घेतले आणि उचलून मांडीवर बसवले.

Mathura Crime News
Rahul Gandhi News: 'पापा, आपके निशान मेरा रास्ता हैं…' वडिलांच्या आठवणीत राहुल गांधी भावूक; लडाखमधून वाहिली आदरांजली

त्यानंतर या साधूने अंकितला कडेवर घेत घट्ट मिठी मारून इकडे तिकडे फिरत राहिला. थोड्याच वेळात त्याने अंकितला रस्त्यावर फेकून दिले. आरोपी साधू ऐवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अनेक वेळा अंकितला रस्त्यावर आपटले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या निष्पाप अंकितचा जागीच मृत्यू झाला.

हे वेदनादायक दृश्य पाहताच रस्त्यावरून जाणाऱ्या आणि स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी केली. त्यांनी साधूला पकडून बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीची जमावाच्या तावडीतून सुटका केली. जमावाने केलेल्या मारहाणीत आरोपी जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Mathura Crime News
Pakistan Bus Fire: पाकिस्तानमध्ये मोठी दुर्घटना! अपघातानंतर बस पेटली... २० जणांचा होरपळून मृत्यू ; भयानक व्हिडिओ

आरोपी साधूचे नाव ओमप्रकाश (६० वर्षे) असं असून तो मध्य प्रदेशच्या मुरैना येथील रहिवासी आहे. या घटनेप्रकरणी अंकितचे वडील ओमप्रकाश यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी ओमप्रकाशविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ओमप्रकाशने हे कृत्य का केले यामागचे कारण अस्पष्ट आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी अंकितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. आरोपी मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. पण वैद्यकीय तपाणीनंतरच खरे कारण समोर येईल.

Mathura Crime News
Chandrayaan-3 Update : चांद्रयान- 3 चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर, आता प्रतीक्षा सॉफ्ट लँडिंगची

अंकितचे वडील हरपाल यांनी सांगितले की, त्यांना तीन मुलं आहेत. अंकित भावंडांमध्ये सर्वात छोटा होता. ते भाड्याच्या घरात राहतात. फळे विकून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अंकितच्या मृत्यूमुळे हरपाल यांची पत्नी आणि इतर दोन मुले अस्वस्थ आहेत. आरोपीने त्यांच्या मुलासोबत हा प्रकार का केला हे त्यांना माहीत नाही. आरोपीला कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी अंकितच्या कुटुंबीयांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com