swabhimani shetkari sanghatana celebrate bhaubeej with minister hasan mushriff saam tv
महाराष्ट्र

Bhaubeej 2023 : 'स्वाभिमानी'च्या महिला आघाडीची मंत्री हसन मुश्रीफांना खर्डा भाकरीची ओवाळणी

Swabhimani Shetkari Sanghatana : आज राजू शेट्टी हे आंदाेलनाची पुढची दिशा निश्चित करणार आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

ऊस उत्पादक शेतक-यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज (बुधवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीने कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushriff) यांना भाऊबीज (bhaubeej 2023) निमित्त खर्डा भाकरी देवून ओवाळणी केली. या अऩाेख्या आंदाेलनाची चर्चा काेल्हापूरात सुरु आहे. (Maharashtra News)

मागील वर्षी तुटलेल्या उसाला चारशे रुपये दुसरा हप्ता द्यावा. तसेच यंदा 3500 रुपये उसाला दर मिळावा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे. या मागणीच्या पुर्तेतेसाठी संघटना राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून साखर कारखान्यांच्या दारात आंदाेलन करीत आहे.

या आंदाेलनात आता स्वाभिमानीची महिला आघाडी देखील उतरली आहे. सरकार आणि कारखानदारांनी शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. या आंदोलनात तोडगा न काढल्याने आणि शेतक-यांची दिवाळी रस्त्यावर गेली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यामुळे दिपावली भाऊबीज निमित्त स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने आमदार, खासदार लोकप्रतिनिधींना खर्डा भाकरी देवून ओवाळणी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कागल (kagal) तालुक्यातील महिलांनी खर्डा भाकरी देवून ओवाळणी केली. यावेळी मुश्रीफ यांनी महिला आघाडीशी चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासित केले.

दरम्यान हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे आज राजू शेट्टी हे आंदाेलनाची पुढची दिशा निश्चित करणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT