Swabhimani Shetkari Sanghatana saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana: जयंत पाटलांच्या कारखान्यावर धडकले स्वाभिमानीचे कार्यकर्ते, ऊस गाळपसाठीच्या गव्हाणीत मारल्या उड्या

या आंदोलन ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विजय पाटील

Sangli News :

सांगली जिल्ह्यातील ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे. इस्लामपूरच्या साखराळे येथील राजारामबापू साखर कारखान्यामध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घुसत उसाच्या गाळपसाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या. या कारखानाचा ऊस काटा बंद पाडण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. (Maharashtra News)

उसाला पहिली उचल एफआरपी जाहीर करावी आणि प्लस 100 रुपये देण्यात यावे. कोल्हापूर जिल्हाने जो निर्णय जाहीर केला आहे तो सांगली जिल्ह्यात राबवावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.

आजपासून (शुक्रवार) सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यावर कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या इस्लामपूर साखर कारखान्यासमोर काटा बंद आंदोलन करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले हाेते. या आंदोलनात स्वतः हा राजू शेट्टी (raju shetti latest marathi news) सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

इस्लामपूर साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते काटा बंद करण्यासाठी साखर कारखान्याच्या परिसरात घुसले. या ठिकाणी साखर कारखान्याचा आतील ऊस काटा बंद पाडण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीसांनी या ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीसांचा दबाव झुगारून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या आत घुसून उसाचा गाळप बंद पाडण्यासाठी उसाच्या गव्हाणीत थेट उड्या देखील मारल्या. यामुळे कारखाना परिसरात तणाव निर्माण झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Railway Station : संतापजनक! रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला शिव्या दिल्या, कॉलर पकडली; कारण फक्त समोसा

मोलकरणीसोबत शारीरिक संबंध अन्.. पत्नीनं पुस्तकातून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल केले धक्कादायक खुलासे

Rashmika Mandanna Photos : "रूप तेरा मस्ताना..."; रश्मिकाच्या क्युट स्माइलवर चाहते फिदा

Crime: धनत्रयोदशीला भयंकर हत्याकांड! आश्रमात झोपलेल्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या, बायकोच्या डोळ्यासमोर संपवलं

SCROLL FOR NEXT