bachchu kadu, raju shetti saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti : अजित पवारांच्या इशा-यावर चालणार असाल तर शेतक-यांना विचार करावा लागेल; राजू शेट्टींचा सरकारला इशारा (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांच्या इशा-यावर त्यांच्या साेईचे राज्याचे साखर कारखानारांचे धाेरण ठरणार असेल तर याेग्य नसल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नमूद केले. शिरोळ येथून आजपासून राजू शेट्टींच्या आक्रोश पदयात्रेस (swabhimani shetkari sanghatana akrosh padyatra) प्रारंभ झाला. त्यावेळी साम टीव्हीशी संवाद साधताना शेट्टींनी सरकारवर टीकेची झाेड उठवली. (Maharashtra News)

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (bachchu kadu) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (raju shetti) यांची सांगली येथे भेट घेऊन आजपासून राजू शेट्टी यांच्या सुरू होणा-या आक्रोश मोर्चाच्या ५२२ किलोमीटर पदयात्रेस पाठिंबा व्यक्त केला. यावेळी शेतक-यांच्या (farmers) प्रश्नावर आवाज तीव्र करण्यासाठी कडू यांनी शेट्टींना असूड भेट दिला.

यावेळी त्यांनी राज्यातील शेतक-यांचे प्रश्न, विविध शेतकरी आंदोलने व त्याबाबत पुढील भुमिकेबाबत तसेच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत जवळपास दिड तासाहून अधिक काळ चर्चा केली. आमदार बच्चू कडू हे काल सातारा जिल्ह्यांच्या दौ-यावर होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकर मादनाईक , शिरोळ तालुकाध्यक्ष शैलेश आडके , सागर मादनाईक यांचेसह प्रहार व स्वाभिमानीचे प्रमुख पदाधिकारी ऊपस्थित होते

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आजपासून आक्रोश पदयात्रा सुरू झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री दत्त सहकारी साखर कारखान्यापासून या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे.

हे सरकार, राज्य शासन शेतकऱ्यांच्या बाजूने नसल्याने शेतकऱ्यांमध्ये आपल्या हक्काची जागृती करण्यासाठी ही पदयात्रा काढत आहोत, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साम टीव्हीशी बोलताना स्पष्ट केली.

शेट्टी म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ५२२ किलोमीटरची पदयात्रा काढत आहे. ही पदयात्रा 22 दिवसांची असून 37 कारखान्यांनी गाळप केलेल्या तीन कोटी टन उसाचे प्रति टन 400 रुपये प्रमाणे बाराशे कोटी वसूल करण्यासाठी या आक्रोश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत शेट्टी यांच्या समवेत हजाऱाे शेतकरी सहभागी झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT