Nashik Crime: डॉ सुवर्णा वाझे यांचा घातपातच; डीएनए अहवालातून धक्कादायक माहिती समोर  अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

Nashik Crime: डॉ सुवर्णा वाझे यांचा घातपातच; डीएनए अहवालातून धक्कादायक माहिती समोर

नाशिक येथील डॉ. सुवर्णा वाजे यांच्याबरोबर घातपात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: नाशिक येथील डॉ. सुवर्णा वाजे (Dr Suvarna Waje) यांच्याबरोबर घातपात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वाजे यांच्या हाडांचा डीएनए अहवाल (DNA Report) नाशिक ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाला आहे. वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए सारखे असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे डॉ. सुवर्णा वाझे यांना शहराबाहेर नेऊन त्यांची जाळून हत्या (Murder) केल्याचे स्पष्ट झाले आहे. (Suvarna Waze assassination Information from DNA report)

हे देखील पहा-

डॉ सुवर्णा वाजे या नाशिक महापालिकेच्या (Nashik) सिडको रुग्णालयामध्ये (hospital) कार्यरत होते. २५ जानेवारी दिवशी मंगळवारी रात्री नाशिक- मुंबई महामार्गावर मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली होती. त्यामध्ये जळून कोळसा झालेली हाडे होती. ही हाडे डॉ सुवर्णा वाजेंचीच असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ आणखीनच वाढले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून (police) तपासाला गती देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या बहीण आणि रुग्णालयात सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.

माहेरच्या नातेवाईकांनी देखील त्यांना काही माहिती दिल्याचे समजते. तसेच डॉ. वाजे यांच्या पतीकडून देखील माहिती घेण्यात आली आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांची गाडी जाळण्याकरिता संशयिताने कोणत्या ज्वलनशील पदार्थाचा वापर केला आहे, याचा शोध पोलिसांनी (police) सुरू केला आहे. शहरात सर्व सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV camera) तपासण्यात येत आहेत. डॉ. सुवर्णा वाजे- जाधव बेपत्ता झाले होते.

यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. २५ जानेवारी दिवशी म्हणजे मंगळवारी रात्री मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली होती. त्यामध्ये जळून कोळसा झालेली हाडे होती. अचानक एका अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेमध्ये सापडल्याने मोठया प्रमाणात खळबळ उडाली होती. ती हाडे आणि तो मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच आहे का? हे तपासण्याकरिता ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT