Punjab: काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धूंच्या अडचणीत वाढ; रोडरेज प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी

आगामी निवडणुकीच्या अगोदरच नवज्योत सिंह सिद्धू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Punjab: काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धूंच्या अडचणीत वाढ; रोडरेज प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी
Punjab: काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धूंच्या अडचणीत वाढ; रोडरेज प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणीSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: आगामी निवडणुकीच्या अगोदरच नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंजाब (Punjab) काँग्रेसचे नवज्योत सिंह सिद्धू मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. रोडरेजच्या जुन्या प्रकरणावरून, नवज्योतसिंह सिद्धू यांच्या शिक्षेत वाढ करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आज सुनावणी होणार आहे. ३४ वर्षे जुन्या या प्रकरणामध्ये फक्त दंडाची शिक्षा देण्यात होती. १९८८ च्या घटनेमध्ये गुरनाम सिंह यांची हत्या (Murder) करण्यात आली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने २००७ मध्ये सिद्धू आणि संधू यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली होती.

हे देखील पहा-

उच्च न्यायालयाने (High Court) सिद्धू यांना या प्रकरणामध्ये ३ वर्षांची शिक्षा सुनावली होती. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांची निर्दोष मुक्तता केली होती. तरीदेखील पीडित कुटुंबाने २०१८ मध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. आता निवडणुकीच्या (election) रणधुमाळीमध्ये सर्वोच्च न्यायालय आज या याचिकेवर सुनावणी करणार आहे. शिक्षेत वाढ करण्याच्या मागणीवरच विचार केला जाणार का? असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सिद्धूला आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत केवळ प्राणघातक हल्ल्याकरिता दोषी ठरवण्यात आले आहे. ज्यामध्ये जास्तीत जास्त एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

Punjab: काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धूंच्या अडचणीत वाढ; रोडरेज प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी
Aurangabad Crime: नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलीवर बापानेच केला बलात्कार

फिर्यादीनुसार, नवज्योत सिंह सिद्धू आणि त्यांचा सहकारी रुपिंदर सिंह संधू २७ डिसेंबर १९८८ या दिवशी पटियाला (Patiala) येथील शेरनवाला गेट (Sheranwala Gate) चौकाजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या जिप्सीमध्ये बसले होते. यावेळी एक वृद्ध व्यक्ती आणि इतर दोघे पैसे काढण्याकरिता बँकेत जात होते. चौकाचौकात पोहोचल्यावर मारुती कार चालवत असलेल्या गुरनाम सिंह नावाच्या व्यक्तीने सिद्धू आणि संधू यांना रस्त्याच्या मधोमध जिप्सी काढण्यास सांगितले होते. यावरुन दोन्ही गटात चांगलीच बाचाबाची आणि मारहाण झाली होती. यानंतर गुरनाम सिंह यांचा मृत्यू झाला ट्रायल कोर्टाने सप्टेंबर १९९९ मध्ये सिद्धू यांची हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती. सिद्धू आणि संधू यांच्या अपीलांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरनाम सिंह यांच्या मृत्यूच्या कारणासंबंधीचे वैद्यकीय पुरावे पूर्णपणे अस्पष्ट असल्याचे सांगितले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com