नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू

कॉलेज प्रशासनाकडून आरोपांच खंडन

अभिजित सोनावणे

नाशिक - मेडिकल कॉलेजमध्ये Medical College एका शिकाऊ डॉक्टरचा Doctor संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उडाली आहे. मृतकाचे नाव डॉ. स्वप्नील महारुद्र शिंदे Swapnil Shinde असे होते. मृत डॉ. स्वप्नील शिंदे गायनॅकॉलॉजिच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मेडिकल कॉलेजच्या वॉशरूममध्ये स्वप्नीलचा मृतदेह आढळला आहे. या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.

स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी रॅगिंग प्रकरणातून घातपात झाल्याचा आरोप केला आहे. तसेच कॉलेजमधील दोन मुलींवर आरोप करत या मुलींवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर देखील गंभीर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी आहे.

हे देखील पहा -

दरम्यान, या आरोपांवर आता कॉलेज प्रशासनाकडून खंडन करण्यात आले आहे. कॉलेज प्रशासनाकडून अशी माहिती देण्यात आली की, मृत विध्यार्थ्याला वेळो वेळी सहकार्य करण्यात आले. कॉलेजच्या डीन यांनी बोलताना सांगितले की, मृत विद्यार्थी डॉकटरवर मानसोपचार सुरू असल्याची कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तसेच रॅगिंग प्रकरणी कोणतीही तक्रार नव्हती असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वी स्वप्नीलने आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. इतकेच नाहीतर आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट देखील लिहिली होती. या नोटमध्ये त्याने दोन मुलींची नावे लिहिली असल्याची समोर आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'खरी शिवसेना आमचीच'! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण काय?

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील शिरलस शेतशिवारात बिबट्याचा वावर

Velachiche Pani: १ ग्लास वेलचीचे पाणी ठरेल 'अमृत', १५ दिवसांत शरीरात दिसेल बदल

Monsoon health tips: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? आहारात व्हिटॅमिन C असलेले पदार्थ ठेवा!

SCROLL FOR NEXT