COVID 19; भारतात फेक लस, WHO ने केला अलर्ट

भारतात कोरोनाचा विळखा रोखण्याकरिता सुरु करण्यात आले असलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा वापर केला जात आहे.
COVID 19; भारतात फेक लस, WHO ने केला अलर्ट
COVID 19; भारतात फेक लस, WHO ने केला अलर्ट Saam Tv

वृत्तसंस्था : भारतात India कोरोनाचा Corona विळखा रोखण्याकरिता सुरु करण्यात आले असलेल्या लसीकरण Vaccination मोहिमेमध्ये सध्या कोविशिल्ड Covishieid , कोव्हॅक्सिन Covacin आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही V लसीचा वापर केला जात आहे. यामध्ये भारत देशात देण्यात येत असलेल्या, कोविशिल्डबाबत शंका उपस्थित झाली आहे. अॅस्ट्राझेनका-ऑक्सफर्डची लस सीरम इन्स्टिट्यूट सध्या तयार करत आहे.

आता त्याच नावाने बनावट लसीच्या वायल्स वापरले जात असल्याचे समोर आले असल्याचे वृत्त लाइव्ह मिंटने दिले आहे. केंद्र सरकारकडून लसीकरणाची मोहिम पारदर्शकपणे राबवली जावी याकरिता तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आलेली आहे. कोविन प्लॅटफॉर्मवर नागरिकांचे लसीकरणाकरिता नोंदणी केली जात आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेला भारत आणि युगांडमध्ये बनावट कोविशिल्ड लस आढळलेली आहे.

हे देखील पहा-

जागतिक आरोग्य संघटनेने कोविशिल्डबाबत अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दक्षिण आणि पूर्व आशिया आणि आफ्रिका याठिकाणी जुलै व ऑगस्टमध्ये बनावट कोविशिल्ड लस सापडलेली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगितलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दुजोरा दिला असल्याचे WHO ने सांगितले आहे. भारताने रुग्णालये, क्लिनिक्स, हेल्थ केअर सेंटर, डिस्ट्रिब्युटर्स, फार्मसींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

देशामध्ये विविध भागांत लसीचा पुरवठा करणाऱ्यांनी याबाबत अतिदक्ष राहिले पाहिजे. याच्याकडून बनावट उत्पादन पुरवले जाणार नाही. याकडे लक्ष द्यायला हवे असेही आरोग्य संस्थेने सांगितले आहे. आढळून आलेले प्रोडक्ट हे खोट असल्याचे सिद्ध झाले आहे. जाणीवपूर्वक, फसवणूक करण्याच्या उद्देशाने चुकीची माहिती दिली जात असल्याचे यामध्ये सांगितले आहे. भारतात २ मिलीचे बनावट कोविशिल्ड लसी आढळले आहेत.

COVID 19; भारतात फेक लस, WHO ने केला अलर्ट
भारतात सर्वप्रथम आढळलेल्या कोरोना व्हेरियंटचे WHO ने केले नामकरण

प्रत्यक्षात सीरम इन्स्टिट्यूट अशा प्रकारे २ मिली (४ डोस) लस उत्पादन करत नाही. तर युगांड मध्ये एक्स्पायरी डेट संपलेली कोविशिल्डची लसीची वायल सापडली आहेत. सीरमनेसुद्धा याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला माहिती दिली आहे. बनावट कोरोना लस जागतिक आरोग्यकरिता धोकादायक ठरू शकनार आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता वर्तवली आहे.

अशा प्रकारची बनावट उत्पादने ओळखणे आणि वेळेतच बाहेर काढून, रुग्णांना इजा होण्यापासून थांबवले पाहिजे असे जागितक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. सीरम इन्स्टिट्यूटने याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहे. तर केंद्राने या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com