Beed Police Rajeet Kasale Saam Tv
महाराष्ट्र

Ranjeet Kasle: 'मी पुण्यात येईल, मला अटक करा' रणजीत कासलेचा आणखी एक व्हिडिओ समोर

Ranjeet Kasle Claims Delhi to Pune Flight Requests Police Custody in New Clip: काही गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेल्या कासलेचा नवा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने स्वतःहून पुण्यात येण्याची घोषणा करत अटक करण्याची मागणी केली आहे.

Bhagyashree Kamble

गेल्या काही दिवसांपासून निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले आपल्या विधानांमुळे आणि व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहे. वाल्मिक कराडच्या एनकाऊंटरसाठी सुपारी दिल्याचा दावा त्याने आपल्या व्हिडिओतून केला होता. कासलेच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. सध्या कासलेचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कासलेने स्वत: पुण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. 'मी पुण्यात येईल, मला अटक करा' अशी विनंती त्याने केली आहे.

कासले व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाला?

व्हिडिओमध्ये कासले, 'मी पुण्यात रात्री ९ वाजता पोहोचतोय, मला अटक करा', असं त्याने थेट सांगितलं आहे. 'दुपारी ३:१३ ची माझी फ्लाइट होती. दिल्लीहून पुण्यासाठी, ती लेट झाली आहे. मी पावणे सात वाजता दिल्लीहून निघणार असून, रात्री ९ वाजता विमानतळावर पोहोचेन', अशी माहितीही त्याने दिली. तसेच 'माझे दिल्लीतील लोकेशन साम टीव्हीने ओळखले आहे', असंही त्याने व्हिडिओत म्हटलं आहे.

'पोलिसांनी मला ताब्यात घ्यावं आणि बीड पोलिसांच्या ताब्यात द्यावं', अशी विनंती कासलेने व्हिडिओतून केली आहे. यावेळी कासले याने बैलगाडा शर्यतीच्या मालक पंढरीनाथ फडके यांच्या गाण्याचा संदर्भ देत भावना स्पष्ट केल्या. त्याने आपले विमानाचे तिकीट देखील शेअर केले आहे.

पबमधील रणजीत कासलेचा व्हिडिओ व्हायरल

रणजीत कासलेचे अनेक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहेत. अशातच कासलेने इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहेत. लेट नाईट पार्टी केल्याचा एक पबमधील व्हिडिओही सोशल माध्यमांवर अपलोड केला आहे.

एका व्हिडिओमध्ये कासलेने 'गब्बर इज बॅक' असं कॅप्शन देऊन गाडीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील असल्याचं बोललं जात आहे.

रणजीत कासले नक्की आहे तरी कोण?

रणजीत कासले हा निलंबित पीएसआय आहे. काही गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याची चौकशी सुरू आहे. कासलेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. सध्या पोलीस कासलेचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT