बडतर्फ केलेल्या पोलीसाने हवेत गोळीबार करत वरिष्ठ अधिकाऱ्यावर रोखला पिस्तूल
बडतर्फ केलेल्या पोलीसाने हवेत गोळीबार करत वरिष्ठ अधिकाऱ्यावर रोखला पिस्तूल Saam Tv News
महाराष्ट्र

बडतर्फ केलेल्या पोलीसाने हवेत गोळीबार करत वरिष्ठ अधिकाऱ्यावर रोखला पिस्तूल

गोविंद साळुंके

अहमदनगर: राहुरी येथे मागील काही दिवसांपूर्वी पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक सुनील लोखंडे याच्या विरुद्ध तालुक्यातील दिग्रस येथील एका महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (suspended police fired in the air and takes his senior officer on gun point)

हे देखील पहा -

सदरचा गुन्हा दाखल केल्यानंतर यासंदर्भात पीडित महिलेने जबाब दिल्यास आणखीन अडचणी निर्माण होण्याच्या भीतीने बडतर्फ पोलीस अधिकारी लोखंडे यांनी पीडित महिलेच्या घरात घुसून त्याच्या जवळील पिस्तूल पीडित महिला व तिच्या २ मुलींवर ताणली. यासंदर्भात माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी पोहचले. त्यावेळी दहशत निर्माण करण्यासाठी लोखंडे यांनी हवेत १ गोळी देखील झाडली. त्यानंतर चर्चेतून मार्ग काढू असे सांगून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी, बडतर्फ पोलीस लोखंडे यांने रिव्हॉल्वरच्या निशाण्यावर धरलेल्या मुलांना त्याच्या ताब्यातुन सुखरूप बाजूला काढले.

त्यानंतर, आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी बडतर्फ पोलीस लोखंडे यांच्यावर झडप घातली. त्यावेळी लोखंडे याने मिटकेंवर गोळी झाडली. सुदैवाने पिस्तूल सुटलेल्या गोळीची दिशा चुकविल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी, बडतर्फ पोलीस अधिकाऱ्यास ताब्यात घेतले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

SCROLL FOR NEXT