औरंगाबादमध्ये अतिवृष्टीने ५५९ कोटींचे नुकसान - पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद जिल्ह्यात सलग अतिवृष्टी व महापुरामुळे सुमारे ५५९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
औरंगाबादमध्ये अतिवृष्टीने ५५९ कोटींचे नुकसान - 
पालकमंत्री सुभाष देसाई
औरंगाबादमध्ये अतिवृष्टीने ५५९ कोटींचे नुकसान - पालकमंत्री सुभाष देसाईSaam Tv News
Published On

मुंबई: औरंगाबाद जिल्ह्यात सलग अतिवृष्टी व महापुरामुळे सुमारे ५५९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत ही माहिती सादर करून राज्य शासनाने तातडीने भरपाई देण्याची मागणी केली. (559 crore loss due to heavy rains in Aurangabad)

हे देखील पहा -

औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी एकूण सरासरीच्या दीडपट अधिक पाऊस झाला. यात चार लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. तर १७ जणांचा बळी गेला. सुमारे १८६० घरांचे अंशतः नुकसान झाले. सुमारे ७४० किलोमीटरपर्यंत रस्त्याचे नुकसान झाले. १७ तलाव फुटले असून २१ कोल्हापुरी बंधारे वाहून गेले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या, रस्ते, लघु-मध्यम प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने प्राथमिक पंचनामे करून तातडीने मदत केली असली तरी नुकसानीचा आकडा मोठा आहे. विविध विभागांच्या आकडेवारीनुसार ५५९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सुभाष देसाई यांनी यावेळी नमूद केले, व विनाविलंब तरतूद करावी अशी मागणी केली.

दरम्यान, केंद्र शासनाच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या निकषांनुसार पंचनामे केले जात असल्याचा मदत व पुनर्वसन सचिवांनी खुलासा केला श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले. यावेळी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी आपपल्या जिल्ह्यातील नुकसानीची माहिती सादर केली. राज्य तसेच केंद्र शासनाने आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी सर्वांनी आग्रह धरला.

औरंगाबादमध्ये अतिवृष्टीने ५५९ कोटींचे नुकसान - 
पालकमंत्री सुभाष देसाई
पुणे नवरात्र महोत्सवात लक्ष्मी मातेला पंचवीस किलो चांदीची साडी अर्पण

पालकमंत्र्याचा आज औरंगाबाद दौरा

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दि. ७ रोजी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील नुकसानीची पाहणी करणार आहेत. पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com