MIAM Charitable Trust google
महाराष्ट्र

ग्रीन गडचिरोली मिशनला सूरजगड इस्पात आणि एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टकडून पाच लाख रोपांचे योगदान

Green Gadchiroli Mission : ग्रीन गडचिरोली मिशनला सूरजगड इस्पात आणि एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टकडून ५ लाख रोपांचे योगदान मिळाले आहे.

Sakshi Sunil Jadhav

मुंबई, ता ७: ग्रीन गडचिरोली मिशन अंतर्गत सूरजगड इस्पात प्रा. लि. आणि एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्ट यांनी पाच लाख रोपांचे योगदान जाहीर केले आहे. या उपक्रमाला अधिकृत स्वरूप देताना सूरजगड इस्पातच्या संचालिका तथा एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक नीतू जोशी यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत गडचिरोलीला हरित, पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर जिल्हा बनविण्याचा संकल्प मांडला.

या मिशनअंतर्गत पाच लाख रोपे लावली व संवर्धित केली जाणार असून त्यामुळे हरित क्षेत्र वाढण्यास, जैवविविधतेच्या संरक्षणास आणि पर्यावरणीय समतोल बळकट होण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमातून रोपवाटिका, वृक्षारोपण आणि संबंधित कामांद्वारे २०० हून अधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच शेकडो आदिवासी कुटुंबांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण झाले आहेत.

नीतू जोशी म्हणाल्या, “हवामान बदलाविरुद्धची लढाई तळागाळातून सुरू झाली पाहिजे. आमचे उद्दिष्ट केवळ झाडे लावणे नसून पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती यांना एकत्र जोडणारी शाश्वत व्यवस्था उभी करणे आहे.”

एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्ट महिला सक्षमीकरण, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, प्राणी कल्याण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेने १०० हून अधिक महिलांना अन्नप्रक्रिया, आदरातिथ्य सेवा आणि विविध कौशल्य विकास प्रशिक्षण दिले आहे. तसेच नाशिक आणि गडचिरोली येथील मोफत ग्रंथालये व करिअर मार्गदर्शन उपक्रमांच्या माध्यमातून ३० हून अधिक ग्रामीण युवकांना सैन्य, पोलीस आणि इतर शासकीय सेवांमध्ये रोजगार मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT