PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! कोणत्याही क्षणी खात्यात येणार ₹२०००? महत्त्वाची अपडेट आली समोर

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा पुढील २००० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. लाभ मिळवण्यासाठी तुम्ही केवायसी करणं अनिवार्य आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On

भारतात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यातलीच एक प्रसिद्ध योजना म्हणजे पीएम किसान योजना आहे. यामध्ये शेतीकऱ्यांना २००० रुपयांची केंद्र सरकारकडून मदत मिळते. आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी २२ हप्ते घेतलेले आहेत. महत्वाचं म्हणजे पुढील हप्ता (PM Kisan Yojana 23rd Instalment) कधी येणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यासंदर्भात एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे.

पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी येणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १३ मार्च २०२६ पासून पीएम किसान योजना सुरु केली. तर या योजनेचे आत्तापर्यंत २२ हप्त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला आहे. तर पुढील हप्ता हा जून-जुलै या महिन्यांच्या आसपास येण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कोणत्याही तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. तसेच अधिकृत घोषणाही करण्यात आलेल्या नाहीत. तर या योजनेत लाभार्थ्यांना २००० रुपयांचे ३ हप्ते थेट त्यांच्या बॅंकेच्या खात्यात पाठवले जातील.

PM Kisan Yojana
Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'चा बॉक्स ऑफिसवर धमाका, तिसऱ्या गुरुवारी १०२.७० कोटींचा टप्पा पार

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे?

तुम्हाला जर मागिल हप्ते आले नसतील तर तुम्ही सर्वात आधी ई-केवायसी प्रोसेस करणे गरजेचे आहे. जर तुम्ही ही प्रोसेस केली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तुम्ही त्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करून ईकेवायसी पूर्ण करू शकता.

पीएम किसान ईकेवायसी प्रोसेस

सर्वप्रथम तुम्ही pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. मग तिथे "e-KYC" या पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये तुमचा आधार नंबर न चूका टाका. मग तुम्हाला otp येईल. ते वेरिफाय करून सबमिट बटणावर क्लिक करा. मग तुम्ही "Beneficiary Status" वर क्लिक करून तुमचे पैसे आलेत की नाहीत? याची तपासणी करू शकता.

PM Kisan Yojana
PF Withdrawal Process: कामाची बातमी! PF चे पैसे झटक्यात काढा, UPI नं थेट बँक खात्यात येणार, फक्त ३ सोप्या स्टेप्स करा फॉलो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com