नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी सहलीस गेलेल्या भाजप नगरसेविकेचा हार्ट अटॅकने मृत्यू! SaamTvNews
महाराष्ट्र

नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी सहलीस गेलेल्या भाजप नगरसेविकेचा हार्ट अटॅकने मृत्यू!

सुरगाणा नगराध्यक्ष पदाची निवडणुक 15 तारखेला आहे. त्या अगोदर दगाफटका नको म्हणून भाजपने नगरसेवकांची सहल काढली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- तबरेज शेख

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा नगरपंचायतीच्या (Surgana Nagarpanchayat) नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे. नगराध्यक्षपदाच्या (Mayor) निवडणुकीपूर्वी सहलीत गेलेल्या भाजप नगरसेविकेचा (Corporator) मृत्यू झाला आहे. मुक्कामी असलेल्या हाॅटेलमध्ये नगरसेविकेला आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. (Surgana BJP corporator dies of heart attack Before mayoral election)

हे देखील पाहा :

सुरगाणा (Surgana) नगरपंचायतीत वार्ड क्रमांक १६ मधून नगरसेविका काशीबाई पवार निवडून आल्या होत्या. नगराध्यक्ष पदाची निवडणुक (Election) 15 तारखेला आहे. त्या अगोदर दगाफटका नको म्हणून भाजपने (BJP) नगरसेवकांची सहल काढली होती. निवडणुकीच्या ऐनवेळी अगोदर येऊन बहुमत जाहीर करण्याचा भाजपचा कल होता. मात्र, वापी येथे एका हॉटेलमध्ये थांबले असताना नगरसेविका काशीबाई पवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips For Man: पुरूषांनी वजन कमी करण्यासाठी 7 टिप्स फॉलो करा, सुटलेलं पोट जाईल आत

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार 421 अर्जापैकी 377 प्रमाणपत्र वितरित

Friday Horoscope: आर्थिक लाभ, प्रेमाची कबुली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

SCROLL FOR NEXT