Suresh Dhas 
महाराष्ट्र

Suresh Dhas: मी शंभर टक्के देशमुखांच्या पाठिशी; मात्र मुंडेंच्या भेटीवरून काहीतरी वेगळंच प्लनिंग,धसांना संशय

Suresh Dhas: बीडमध्ये धस आणि मुंडे संघर्ष टोकाला गेलाय, त्याच दरम्यान भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आलीय.

Bharat Jadhav

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून बीड ते मुंबईचं राजकारणला हादरुन सोडणारे सुरेश धस मुंडेंच्या भेटीवरून अडचणीत आलेत. राज्याचे अन्न-पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची गुप्त भेट झाल्याची बातमी समोर आल्यानंतर उलट सुलट चर्चांना उधाण आलं. त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत भेटीच्या बातमी लीक करत आपल्याविरोधात काहीतरी प्लॅनिग केलं जात असल्याचा संशय सुरेश धस यांनी व्यक्त केला

धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीची चर्चा सुरू झाल्यानंतर माध्यमांपुढे येत सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आपण माणुसकीच्या नात्याने धनंजय मुंडे यांची भेट घेतली. पण आपला लढा हा चालूच राहील. संतोष देशमुख यांच्या पाठिशी आपण आहोत, जो पर्यंत आरोपी लोकांना फाशी होत नाही तोपर्यंत आपण संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी राहणार आहे. शंभर टक्के त्यांच्या सोबत आहोत. पण भेटीची बातमी लीक करून कोणीतरी मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत असेल असा आरोप सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत केला.

भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून अख्या हादरून सोडलंय.देशमुख हत्या प्रकरणावरून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची मोठी राळ उठवलीय. देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगवारी झालीय. या कराडसोबत धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध आहेत. त्यावरून धस यांनी त्यांचा पिच्छा पुरवलाय. धनंजय मुंडेंमुळे कराड गुंडगिरी करत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला.

बीडमधील या आकाचा आका कोण असा सवाल करत त्यालाही तुरुंगात टाका असं म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेवर वारंवार हल्लाबोल केलाय. तसेच धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना त्यांनी कोट्यवधी रुपयांचे बिल न काम करता उचललं आहे. त्यातही त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप धस यांनी काही दिवसापूर्वी केला होता. आका आका म्हणत मुंडेंवर शरसंधान करणारे सुरेश यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली त्यावरून धस अडचणीत आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: BMC ची वनक्षेत्र आणि संरक्षित झोपडपट्टी परिसरात टॉवर उभारण्यास परवानगी

Pune : "तुम्हाला घरपोच दारू मिळेल" होम डिलिव्हरीचे आमिष दाखवून ग्राहकांना लाखोंचा गंडा

EPFO Alert : नोकरदारांनो लक्ष द्या! ऑक्टोबरचा PF जमा करण्याची शेवटची तारीख ठरली! लगेच जाणून घ्या

Pen Fort : इतिहासप्रेमी अन् ट्रेकर्ससाठी पर्वणी! पेणजवळील 'या' ५ किल्ल्यांची सफर तुम्हाला नक्की आवडेल

Protein Supplements: प्रोटीन सप्लीमेंटमुळे कोलेस्ट्रॉल वाढतंय? डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या व्यक्तींना असतो धोका

SCROLL FOR NEXT