<div class="paragraphs"><p>मराठा आरक्षणापासून पळपुट धोरण हे सरकार स्वीकारत आहे&nbsp; - सुरेश घस</p></div>

मराठा आरक्षणापासून पळपुट धोरण हे सरकार स्वीकारत आहे  - सुरेश घस

 

विनोद जिरे 

महाराष्ट्र

मराठा आरक्षणापासून पळपुट धोरण हे सरकार स्वीकारत आहे - सुरेश घस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड  - बीडमध्ये Beed आरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी कंत्राटी कर्मचारी आले होते. त्यामध्ये वार्ड बॉय,एएनएम,जीएनएम यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांना वेळ न देता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला आहे. या अमानुषपणे केलेल्या लाठीचार्जची चौकशी करण्यात यावी. त्याचबरोबर हा लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला. याची देखील चौकशी करण्यात यावी. अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस Suresh Dhas यांनी केली आहे. Suresh Dhas allegations on State Government

त्याचबरोबर बीडमध्ये मराठा समाजाच्या तरुणाला देखील पोलिसांकडून Police मारहाण झाली आहे असा आरोप करत हे सरकार मराठा आरक्षणापासून Maratha Reservation पळपुट धोरण स्वीकारत आहे. असा टीका आमदार सुरेश धस यांनी सरकारवर केली आहे.

हे देखील पहा -

सुरेश धस पुढे म्हणाले, की मी या लाठीचार्जचा निषेध व्यक्त करतो. यशवंतराव चव्हाण यांचा देखील रस्ता अडवला होता. तेव्हा पोलिसांच्या गाडीवर चढून चव्हाण यांनी घोषणा केली होती. आज आरोग्य मंत्र्यांनी निवेदन घेतलं असतं, तर ही बदनामी त्यांच्या वाट्याला आली नसती. त्यामुळं आज ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला त्याची चौकशी झाली पाहिजे. येणाऱ्या अधिवेशनात याविषयी आवाज उठविणार आहे. याविषयी आम्ही कर्मचाऱ्यांच्या बाजूने असून ठामपणे सरकारच्या विरोधात उभा राहणार आहोत.Suresh Dhas allegations on State Government

त्याचबरोबर मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मुलाला देखील, अमानुष मारहाण केल्याची माहिती मला कळाली आहे.मराठा आरक्षणापासून पळपुटे धोरण हे सरकार स्वीकारत आहे आणि कोणाला आतून-बाहेरून मदत करून मराठा तरुणांना गुमराह करण्याचे काम चालवले आहे. त्यामुळे आता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने, बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढणार आहोत असं देखील आमदार सुरेश धस म्हणाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

SCROLL FOR NEXT