बीड मध्ये आरोग्य सेवकांनी अडवला अजित पवार - राजेश टोपेंच्या वाहनांचा ताफा

बीड मध्ये आरोग्य सेवकांनी अडवला अजित पवार - राजेश टोपेंच्या वाहनांचा ताफा

Vinod Jire

बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडवला अजित पवारांचा ताफा

बीडमध्ये आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी बीड जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा अडवला होता

बीड : बीडमध्ये आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी बीड जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा अडवला होता. यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांकडून महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.

हे देखिल पहा

दरम्यान आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांची सेवा करत आहोत, मात्र शासनाकडून मनाला वाटेल तेव्हा आम्हाला काढलं जातं आणि पुन्हा कोरोणा जास्त पसरला की आम्हाला घेतलं जात आहे. यामुळे आम्ही ज्या पदावर काम करतोय, त्या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती द्या. ही मागणी घेऊन बीडमध्ये शेकडो महिला आणि पुरुष कर्मचारी आक्रमक झाले आहेत. तर या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांवर पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला आहे, असा आरोप नर्सेसनी केला.

<div class="paragraphs"><p>बीड मध्ये आरोग्य सेवकांनी अडवला अजित पवार - राजेश टोपेंच्या वाहनांचा ताफा</p></div>
काँग्रेसचे युवक सरचिटणीस गणेश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, बीडमध्ये आरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी कंत्राटी कर्मचारी आले होते. त्यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वेळ न देता त्यांच्यावर, इथं लाठीचार्ज करण्यात आला. या अमानुषपणे केलेल्या लाठीचार्जची चौकशी करण्यात यावी. त्याचबरोबर हा लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला, याची देखील चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. त्याचबरोबर बीडमध्ये मराठा समाजाच्या तरुणाला देखील पोलिसांकडून मारहाण झाली आहे, असा आरोप करत हे सरकार मराठा आरक्षणापासून पळपुट धोरण स्वीकारत आहे, अशी टीका आमदार सुरेश धस यांनी सरकारवर केली.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com