पिंपरी : जागा बळकावल्या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस गणेश गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी - चिंचवडच्या हिंजवडी पोलिस स्टेशन मध्ये गणेश गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांच्या उपस्थितीत गणेश गायकवाड यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश झाला होता. बांधकाम व्यावसायिक विजय वसंत कुलकर्णी यांच्या ट्रिनीटी रिऍलिटी फर्मची ६० गुंठे जागेत बेकायदेशीर रित्या पत्र्याचे आणि तारेचे कुंपण करून जागा बळकावल्या प्रकरणी गणेश गायकवाड विरुद्ध हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आल आहे.
हे देखिल पहा
या प्रकरणी हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार मुळशी तालुक्याल सुस येथे घडला असून, बांधकाम व्यावसायिक विजय कुलकर्णी यांनी गायकवाड यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. तक्रारदार कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार आरोपी गायकवाड याने त्यांच्या मालकीच्या ट्रिनीटी रिऍलिटी फार्मच्या ६० गुंठे जागेत बेकायदेशीरपणे घुसून पत्र्याचे व तारेचे कुंपण घातले आणि जागा बळकावण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी कुलकर्णी यांना जागेत येण्यास मज्जावही केला.
त्याच बरोबर मोजणी नकाशामध्ये फेरफार करून कुलकर्णी यांच्या मालकीच्या जागेत तुटक रेषा मारली आणि बनावट नकाशा पोलिसांकडे जबाबासोबत सादर करून फसवणूक केल्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी केदार उर्फ गणेश गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
कोण आहेत गणेश गायकवाड?
पुण्यातील औन्ध परिसरात राहणारे गणेश गायकवाड प्रसिद्ध उद्योगपती असून बांधकाम क्षेत्रातील एनएसची ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या गणेश गायकवाड यांनी मागील महिन्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आणि लगेचच
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी गायकवाड यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी केली.
2019 विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी गायकवाड प्रयत्नशील होते. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते चर्चेत आहे होते. दरम्यान या प्रकरणी सत्यजित तांबे गायकवाड विरुद्ध काही कारवाई करतात का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गणेश गायकवाड यांच्याशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.