बुध स्वामी असलेली द्विस्वभाव रास. जुळ्यांची रास असे याला म्हणतात. बुध हा युवराज म्हणून हे लोक तरुण दिसतात. मोकळेपणाने बोलायला आवडते. खूप बोलके असतात. स्वार्थीपणा कमी.
हा बुध काहीसा उथळ आहे त्यामुळे "एक ना धड भाराभर चिंध्या" अशा गोष्टी आपल्यात दिसतात. पण तरुण दिसणं, शोधक पणा, स्वतंत्र, प्रेमळ, हुशारी, चलाखी या गोष्टी आपल्याला आवडतात.
मोकळेपणानं हसतील आणि बोलतील सुध्दा. कोणतेही छक्के पंजे मनात नसतात. आला दिवस आनंदात ढकलायला आपल्याला आवडते. जुन्या गोष्टी वापरायला आवडत नाही. रोज नव्याने काहीतरी हवं असतं आणि म्हणूनच हा हट्टीपणा, चंचलपणा, उधळेपणा त्रासदायक ठरतो.
कधी कधी इतरांचे पैसे सुद्धा आपण सहज वापरता आणि त्यामध्ये काहीच चूक नाही केली असे अशी भावना आपल्याला असते. म्हणजेच काय सहजपणे खोटं बोलणं हेही जमतं. खोट्या सह्या करणे हे जमतं. हातावर तुरी गोड देणं हे जमतं. आणि चेहरा आणि बोलणे इतके निरागस असते की जसं काही आपण केलेच नाही असे भाव येतात.
पण तृतीय स्थानाचे द्योतक आहे सातत्याने नवीन काहीतरी करायला आवडतं आणि त्यामध्ये आपणच पुढे असायला हवं ही जिद्द असते. आपल्या राशीचा अंमल शरीरातील फुफ्फुसावर आहे त्यामुळे फुफ्फुसाशी निगडित आजार, काही वेळेला मानसिक ताण त्रास यामुळे होणारे आजार नको त्या चिंता, सर्दीचे त्रास बुध हा त्रिदोषाचा कारक आहे.
त्यामुळे अशा प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात. त्वचेचे आजार संभवतात. हे रोग आपल्या राशीकडे प्रामुख्याने येतात. राशीची उत्तम फलिते मिळण्यासाठी विष्णुसहस्त्रनाम रोज म्हणावे. अगदीच जमले नाही तर अष्टोत्तरशत श्रीकृष्ण नामावली म्हणावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.