Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Relationship Tips : लग्नाचं नातं खूप नाजूक असतं. लग्नानंतर नवरा- बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण होण्यास छोटीशी गोष्टीही कारणीभूत ठरत असते. त्यामुळे पती-पत्नीचं नातं जपतांना सावधगिरी बाळगली पाहिजे.
Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' 3 प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख
Relationship Tips

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी जीवन योग्य पद्धतीने जगण्यासाठी अनेक निती सांगितली आहेत. जर एखाद्या व्यक्तीने या नितींचे पालन केले तर त्याचे जीवन सुधरू शकते. कोणत्याही व्यक्तीने लग्न करण्यापूर्वी आपल्या भावी जोडीदाराला तीन प्रश्न विचारली पाहिजेत. जेणेकरून नातेसंबंध टाळता येतील.

लग्नाचं नातं खूप नाजूक असतं. लग्नानंतर नवरा- बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण होण्यास छोटीशी गोष्टीही कारणीभूत ठरत असते. त्यामुळे पती-पत्नीचं नातं जपतांना सावधगिरी बाळगली पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नितीमध्ये लग्नाआधी आपल्या भावी जोडीदाराला नातं सुरू करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचे तीन प्रश्न विचारले पाहिजेत. या प्रश्नांची उत्तर मिळाल्यानंतर तुम्ही तुमचं भावी जीवन आनंदात घालवू शकतात. जर तुम्ही प्रश्न केले नाहीतर तर तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होत नाहीच भांडणं होत राहतील.

वयाबद्दल जरूर जाणून घ्या

आचार्य चाणक्य यांच्या नीति शास्त्रानुसार, लग्नापूर्वी भावी जोडीदाराचे वय निश्चितपणे विचारले पाहिजे. पती-पत्नीमधील वयातील फरक आणि त्यांच्यातील समजूतदारपणाचा अभाव हे लग्न तुटण्याचे कारण ठरू शकतं. वयातील अंतरामुळे दोघांमध्ये अनेक गोष्टींबाबत समजूतदारपणा नसतो. ज्यामुळे भांडणही होऊ शकते. यामुळे पती-पत्नीच्या वयात फारसा फरक नसावा अन्यथा वैवाहिक जीवनात आनंद राहत नाही.

आरोग्याची तपासणी करा

लग्नापूर्वी तुमच्या भावी जोडीदाराच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती मिळवा. त्याला काही शारीरिक किंवा मानसिक समस्या आहेत का? याची माहिती घेतली पाहिजे. नाहीतर तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दरम्यान भावी जीवन साथीदाराच्या आरोग्याबाबत माहिती घ्यावी असं चाणक्य नितीमध्ये सुद्धा नमूद करण्यात आले आहे.

नात्याबद्दल जाणून घ्या

लग्नापूर्वी तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराच्या भूतकाळातील नातेसंबंधांबद्दल नक्कीच विचारले पाहिजे. किंवा शोधले पाहिजे. जर तुम्ही याबद्दल खुलेपणाने बोललात तर तुमच्या भावी वैवाहिक जीवनासाठी ते खूप चांगले होईल. बहुतेकवेळा वैवाहिक जीवनात कलह निर्माण होण्यामागे भुतकाळातील नाते, प्रेम प्रकरण कारणीभूत ठरत असतात. लग्नाआधीच्या गोष्टी सात फेरे घेताना अग्नीकुंडात दहन केल्या पाहिजेत.

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' 3 प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख
Relationship Tips : डेट करणाऱ्या मुलीशी चॅटवर बोलताना 'ही' काळजी घ्या; प्रेमाचं नातं आणखी बहरेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com