प्रेमाच्या नात्यात आजही मुलंच मुलींना प्रपोज करतात आणि आपल्या मनातील भावना बोलून दाखवतात. एखाद्या मुलीला इंप्रेस करणं तितकसं सोप्प नसतं. त्यासाठी मुलीशी बोलण्यास सुरुवात केल्यापासून तिच्यावर आपलं इंप्रेशन पडलं पाहिजे असं वागावं लागतं. जर तुम्ही सुरुवातीलाच हेल्दी संभाषण ठेवलं नाही तर नातं पुढे जात नाही. प्रपोज केलं तरी मुली नकार देतात.
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात मुलं मुली प्रत्यक्षात कमी आणि फोनवर जास्त बोलतात. त्यामुळे तुम्ही देखील आवडत्या मुलीचा नंबर किंवा इंस्टाग्राम अथवा फेसबूकवर चॅट सुरू केलं असेल तर सुरुवातीला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
ओपन एन्डेड प्रश्न विचारा
काही मुलं सुरुवातीला मुलींशी बातचीत करताना काय करते? जेवली का? असे प्रश्न विचारतात. आता या प्रश्नांनी मुली आधीच बोर झालेल्या असतात. त्यामुळे सतत असे प्रश्न विचारल्यास मुली त्या व्यक्तीला सरळ ब्लॉक करतात. त्यामुळे असे प्रश्न विचारा ज्यावर मुली जास्तवेळ बोलू शकतील त्याची उत्तरे फक्त हो आणि नाही नसतील. तुम्हाला फिरायला कुठे आवडतं. जॉब किंवा कॉलेज विषयी, प्रगतीविषयी प्रश्न विचारल्यास मुली त्या व्यक्तीशी बोलतात.
जुन्या गोष्टींची आठवण करून द्या
मुलींना अशा गोष्टी फार छान वाटतात. कोणीतरी आपल्या चांगल्या गोष्टींबद्दल अपडेट ठेवत आहे याचा मुलींना आनंद होतो. त्यामुळे मुलीने तुम्हाला तिच्या आयुष्यातील चांगल्या रुटीनबद्दल काही महिती दिली असेल तर बोलताना सतत त्याची आठवण करून द्या. उदा. जर काही दिवसांनी तिची परीक्षा असल्याचं तिने सांगितलं असेल तर त्या परीक्षेबाबत तिला प्रश्न विचारा.
इंटरेस्टींग गप्पा मारा
सध्याच्या जगात प्रत्येक मुलगी आयुष्यात काही करण्यासाठी पुढे जाण्यासाठी आणि नाव कमवण्यासाठी धडपड करत असते. त्यामुळे मुलीशी चॅट करताना तिला तिच्या करिअर बाबत प्रश्न विचारा. बिझनेस आणि अॅडवेंचर बाबत तिचे विचार जाणून घ्या आणि त्यानुसार तिच्याशी संवाद साधा.
कॉमेडी रील व्हिडिओ पाठवा
मुलींना त्यांना आनंदी ठेवणारी आणि हसवणारी मुलं फार आवडतात. आता चॅट करताना तुम्ही मुलींसमोर जास्त जोक करू शकत नाही. मात्र तुम्ही त्यांना फनी रील व्हिडिओ पाठवू शकता. या काही टीप्स फॉलो केल्याने मुलीचा तुमच्याचील इंट्रेस वाढेल आणि काही दिवसांतच ती तुम्हाला होकार देईल.
टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. या टीप्सने मुलींचा होकार मिळणार, असा दावा साम टीव्ही करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.