Supriya Sule and Rashmi Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महाराष्ट्रात येणार महिलाराज? सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होणार? गायकवाडांचं वक्तव्य, राजकारण तापलं

Varsha Gaikwad: दिल्लीला आपच्या आतिशी मार्लिनींच्या रुपाने तिसऱ्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर वर्षा गायकवाडांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री होण्याविषयी भाष्य केल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्यात.

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु आहे. त्यातच दिल्लीत आपच्या अतिशी मार्लिना यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच महाराष्ट्रातही महिला मुख्यमंत्री होणार का य़ाची चर्चा सुरु झालीय. त्याला कारणाही तसंच आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री हवी असं विधान केलं. त्या तेवढ्यावरच थांबल्या नाहीत.

तर त्यांनी थेट सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरेंच्या नावाला पसंती दर्शवली. मात्र ठाकरे गटाला हे विधान पचनी पडलेलं नाही. रश्मी ठाकरेंना राजकारणात रस नाही. त्यामुळे त्यांना यात ओढू नका असा खोचक सल्ला ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पडणेकरांनी काँग्रेसला दिलाय.

यामुळे मात्र महायुतीच्या नेत्यांना आयतं कोलित मिळालंय. काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्यामुळेच वर्षा गायकवाडांनी ठाकरे आणि सुळेंचं नाव घेतल्याचा टोला शिंदे गटानं लगावलाय. तर राज्यात काँग्रेसचे आठ मुख्यमंत्री फिरत असले तरी सुप्रिया सुळेंनाच मुख्यमंत्री करण्याची पवारांनी तयारी सुरू केल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय.

पुरोगामी महाराष्ट्रात 65 वर्षात एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही. तर देशाच्या पंतप्रधान पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी आपलं कतृत्व सिद्ध केलंय.

मात्र आता महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असतानाच सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू झालीय...त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची आता अधिकच उत्सुकता वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं

Salman Khan : सलमान खान ऐश्वर्या रायच्या प्रेमात होता वेडा, ब्रेकअपनंतर 'तेरे नाम' गाणं ऐकून ढसाढसा रडायचा

महामार्गावर भीषण अपघात! पहाटे वाहन डिव्हायडरला धडकले; ५ जणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी

Dhantrayodashi Date : यंदा कधी आहे धनत्रयोदशी, १८ की १९ ऑक्टोबर? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि महत्त्व

Heart Attack: धक्कादायक! भारतातील प्रत्येक तिसऱ्या मुलाला हॉर्ट अ‍ॅटॅकचा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT