Bailgada Sharyat saam tv
महाराष्ट्र

Bailgada Sharyat: मोठी बातमी! बैलगाडा शर्यत आणि जल्लिकट्टूला सुप्रीम कोर्टाची परवानगी, बैलगाडाप्रेमींच्या लढ्याला यश

Bailgada Sharyat and Jallikattu : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला आहे. सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निकालात राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे.

Chandrakant Jagtap

>>रोहिदास गाडगे, साम टीव्ही

Supreme Court Final verdict about Bailgada Sharyat And Jallikattu : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला आहे. सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निकालात राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे. विधीमंडळ कायद्याने केलेल्या कायद्यात कोर्ट हस्तक्षेप करणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. हा कायदा प्राण्यांचा छळ करणारा नाही असे निरिक्षण कोर्टाने नोंदवले आहे.

जल्लिकट्टूलाही मिळाली परवानगी

जल्लिकट्टू हा तमिळनाडू राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा भाग असल्याचे विधिमंडळाने घोषित केले आहे. तेव्हा न्यायपालिका यापेक्षा वेगळा विचार करू शकत नाही. कायदेमंडळ हे ठरवण्यासाठी सर्वात योग्य आहे. असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीसोबतच तमिळनाडूतील जल्लिकट्टू या प्रसिद्ध खेळाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

गावगाड्यावरच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या बैलगाडा शर्यतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा वैध ठरवला आहे. यामुळे बैलगाडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेत सर्व बाजु न्यायालयाने ऐकून घेतल्या. (Breaking News)

बैलगाडा शर्यत बंदीविरोधात लढा कसा होता?

- ११ जुलै २०११ ला केंद्रसरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने बैल या प्राण्याचा गँजेटमध्ये समावेश केला.

- यानंतर महाराष्ट्र सरकारने २४ ऑगस्ट २०११ रोजी परिपत्रक काढून बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली.

- बैलगाडा मालक संघटनांनी प्राणी मित्र संघटनांच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. (Latest Political News)

- उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान, १५ फेब्रुवारी २०१३ ला काही नियम व अटी घालून तात्पुरत्या स्वरूपात शर्यंतींना परवानगी.

- प्राणी मित्र संघटनांनी पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावले आणि बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांना मारहाण करण्यात येत असून बैलांचा छळ केला जातो असे न्यायालयात सांगितले.

- पुन्हा उच्च न्यायालयाने ७ मे २०१४ रोजी प्राणी कायद्याचे उल्लघन केल्या प्रकरणी बंदी कायम केली.

- १२ एप्रिल २०१७ ला राज्यसरकारने शर्यत सुरु करण्यासाठी कायदा तयार केला. मात्र कायद्याविरोधात प्राणीमित्रांनी हायकोर्टात आवाहन दिले.

- १६ ऑगस्ट २०१७ ला हायकोर्टाने राज्य सरकारच्या कायद्याला स्थगिती दिली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paid Menstrual Leave: सरकारीच नव्हे, खासगी क्षेत्रातही महिलांना मासिक पाळीदरम्यान भरपगारी सुट्टी

Crime News: कमी वयाच्या मुलाला घरात बोलवून ठेवायची शारीरिक संबंध; नंबर ब्लॉक करताच दिली सुपारी, माजी महामंडलेश्वरचं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal Pune Land Mafia Exposed: घायवळ पुण्यातला लँड माफिया? पोलिसांच्या तपासात कारनामे उघड

Government Apps: तुमच्या फोनमध्ये 'हे' सरकारी अ‍ॅप्स असायलाच हवेत

Maharashtra Politics: भाजपचा नारा; जिथं बळ, तिथं स्वबळ, मराठवाड्यात भाजपला दादांची NCP नको?

SCROLL FOR NEXT