Thackeray vs Shinde saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाचा फैसला आजच! ठाकरे-शिंदे गटाची धडधड वाढली; या आहेत निकालाच्या शक्यता

Thackeray vs Shinde : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळाला होती. त्याचा निकाल आता सर्वोच्च न्यायालय जाहीर करणार आहे.

Chandrakant Jagtap

Supreme Court verdict on Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीकोणातून आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काही तासातच निकाल देणार आहे. त्यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल (SC Hearing on 16 MLAs Disqualification) आजच लागणार असल्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Politics) निकालाची प्रतिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळाला होती. त्याचा निकाल आता सर्वोच्च न्यायालय जाहीर करणार आहे. हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवणारा ठरणार आहे.

गेल्यावर्षी जून महिन्यातच शिवसेनेत ऐतिहास बंडखोरी (Thackeray vs Shinde) झाली. विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांनी रातोरात सुरत गाठली. यानंतर पक्षातील इतर आमदाराही हळू हळू त्यांना जाऊन मिळाले. शिवसेनेतील ही बंडखोरी महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक ठरली. कारण या बंडखोरीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं.

या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा सत्तासंघर्ष निर्माण झाला. एकीकडे हा सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टातही कित्येक महिने गाजत राहिला, तर दुसरीकडे निवडणूक आयोगातही शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे हे दोन्ही गट आमनेसामने आले. निवडणूक आयोगासमोरील लाढाईत शिंदेनी बाजी मारली. पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेना मिळालं. ठाकरे गटाला वेगळं नाव आणि चिन्न देण्यात आलं. (Breaking Marathi News)

परंतु सुप्रीम कोर्टात (Supreme Court)  सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आज निकाल येणार आहे. हा निकाल राज्याच्या राजकाराणाला कलाटणी देणारा ठरणार आहे. या निकालाच्या काय काय शक्याता आहेत यावर एक नजर टाकूया.

निकालाच्या काय आहे शक्यता ?

-आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला जाईल

-आमदार अपात्र ठरल्यास मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, त्यामुळे सरकार पडेल.

- कोर्ट राज्यपालांची भूमिका चुकीची ठरवू शकतं

- जैसे थे परिस्थिती ठेवली तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तात्कालीन उपाध्यक्षांकडे जाईल

- 16 आमदार अपात्र ठरवले तर निवडणूक - आयोगाच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो.

- असे झाले तर पक्षाचं नाव आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळू शकतं. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT