Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील बडा नेता उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Political Crisis: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे यांनी खळबळजनक दावा केला आहे.
Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Saam TV

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या दृष्टीने उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, उद्या सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल देणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे यांनी खळबळजनक दावा केला आहे. (Breaking Marathi News)

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Ajit Pawar News: सत्तासंघर्षाचा उद्या निकाल, त्याआधीच पुण्यात झळकले अजित पवारांचे बॅनर्स; चर्चांना उधाण

 एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेते उदय सामंत हे स्वतः उद्धव ठाकरे साहेब यांच्या संपर्कात आहेत. कारण, ते शिंदे गटात सर्वात शेवटी गेले आहेत. त्यामुळे ते 16 मध्ये आले नाही. यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे, असा खळबळजनक दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

इतकंच नाही तर, एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक आमदार आता फुटणार आहेत. त्यामुळे ते आमच्याकडे येऊ शकतात. उद्या काय परिस्थिती निर्माण होईल त्यावरून तेच होईल. मात्र, काही असो उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय होईल, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) बाजूनं निकाल लागावा यासाठी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज दक्षिणमुखी मारुती मंदिरात होम हवन, पूजा करून साकडे घातले.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Maharashtra Political Crisis: अपात्रतेची टांगती तलवार असलेले ते १६ आमदार कोण?

चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथल्या दक्षिणमुखी मारुती मंदिरात सकाळपासून होम हवण आणि पूजा सुरू केली आहे. सत्ता संघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यापासून प्रत्येक सुनावणीवेळी चंद्रकांत खैरे हे दक्षिण मुखी मारुती मंदिरात होम हवन आणि पूजा करीत आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूनेच लागू दे, अशी प्रार्थना आपण भद्रा मारोतीकडे केली असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली. आम्ही आशावादी असल्यामुळे देव आमची प्रार्थना मान्य करेल, आणि कोर्टाचा निर्णय आमच्याच बाजूने लागेल, अशी आशा देखील खैरे यांनी व्यक्त केली आहे.

मी हिंदुत्ववादी जरी असलो, तरी मी देव भक्त आहे. मी कोर्टाला विनंती करू शकत नाही.मात्र मी देवाला प्रार्थना करू शकतो. राज्याचा सत्ता संघर्षाचा निकाल हा निकाल उद्धवजींच्या बाजूने लागू दे. असंही चंद्रकांत खैरे यांनी बोलताना म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com