Maharashtra Political Crisis: अपात्रतेची टांगती तलवार असलेले ते १६ आमदार कोण?

Maharashtra Political Crisis Latest News: ठाकरे गटाकडून १६ आमदारांना अपात्रेतीच नोटीस बजावण्यात आली आहे. उद्या या आमदारांच्या पात्र किंवा अपात्रेसंदर्भात निर्णय येणार आहे.
uddhav thackeray vs eknath shinde and 15 mla list supreme court will pronounce verdict on disqualification maharashtra political crisis
uddhav thackeray vs eknath shinde and 15 mla list supreme court will pronounce verdict on disqualification maharashtra political crisis Saam TV

Maharashtra Political Crisis Latest News: महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने उद्याचा (गुरूवार) दिवस अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. कारण, उद्या सुप्रीम कोर्ट राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल जाहीर करणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंर्घषाची प्रदीर्घ अशी सुनावणी पार पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला. साधारण ९ महिने या संपूर्ण सत्तासंघर्षावर सुनावणी झाली. (Breaking Marathi News)

मार्च महिन्यात ही संपूर्ण सुनावणी पार पडली. ज्यानंतर कोर्टाने याबाबत निर्णय राखून ठेवला होता. अखेर उद्या (११ मे गुरूवार) सुप्रीम कोर्ट याप्रकरणी निर्णय देणार आहे. अशावेळी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांची बरीच धाकधूक वाढली आहे.

uddhav thackeray vs eknath shinde and 15 mla list supreme court will pronounce verdict on disqualification maharashtra political crisis
Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; CM शिंदेंच्या राजीनाम्यावर केलं भाष्य

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार सत्तेवर असताना एकनाथ शिंदे यांनी साधारण ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केलं होतं. या आमदारांना घेऊन त्यांनी गुवाहाटी गाठली होती. मात्र, ठाकरे गटाकडून १६ आमदारांना अपात्रेतीच नोटीस बजावण्यात आली आहे. उद्या या आमदारांच्या पात्र किंवा अपात्रेसंदर्भात निर्णय येणार आहे. (Maharashtra Political News)

अपात्रतेची टांगती तलवार असणारे ते १६ आमदार कोण?

एकनाथ शिंदे –  एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री असून ते ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे आमदार आहेत.

आमदार तानाजी सावंत – तानाजी सावंत हे शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री असून ते आरोग्य खात्याचा कारभार पाहत आहे. सावंत हे धाराशीव जिल्ह्यातील भूम परंडा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

आमदार अब्दुल सत्तार – अब्दुल सत्तार यांच्याकडे सध्या राज्याचं कृषीखातं आहे. ते कृषीमंत्रि असून सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

आमदार यामिनी जाधव – आमदार यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर त्या निवडून आल्या होत्या.

आमदार संदीपान भुमरे - संदीपान भुमरे हे शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री असून ते संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

आमदार भरत गोगावले – भरत गोगावले हे शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आहे. ते महाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

आमदार संजय शिरसाठ – संजय सिरसाठ हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत.

uddhav thackeray vs eknath shinde and 15 mla list supreme court will pronounce verdict on disqualification maharashtra political crisis
Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टाने निर्णय अध्यक्षांकडे सोपवला तर काय होईल? नरहरी झिरवळ यांनी स्पष्टच सांगितले...

आमदार लता सोनावणे – आमदार लता सोनावणे ह्या चोपडा मतदारसंघातील आमदार आहेत. 2019 साली त्या शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या.

आमदार प्रकाश सुर्वे- आमदार प्रकाश सुर्वे हे शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ते मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

आमदार बालाजी किणीकर – बालाजी किणीकर हे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत.

आमदार बालाजी कल्याणकर – बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

आमदार अनिल बाबर – अनिल बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

आमदार संजय रायमूलकर – संजय रायमूलकर हे मेहेकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

आमदार रमेश बोरनारे – रमेश बोरनारे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे.

आमदार चिमणराव पाटील – चिमणराव पाटील हे एरोंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

आमदार महेश शिंदे – महेश शिंदे हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com