Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; CM शिंदेंच्या राजीनाम्यावर केलं भाष्य

Supreme Court Hearing on Shiv Sena: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या उद्या येणाऱ्या निकालावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis on CM Eknath Shinde Resign Maharashtra Political Crisis
Devendra Fadnavis on CM Eknath Shinde Resign Maharashtra Political CrisisSaam TV
Published On

Devendra Fadnavis on CM Eknath Shinde Resign: महाराष्ट्राच्या दृष्टीने उद्याचा (गुरूवार) दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, उद्या महाराष्ट्रातील राजकीय संघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता आहे. जवळपास वर्षभरापासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट उद्या निकाल जाहीर करणार आहे.

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी माहिती दिल्याचं 'लाईव्ह लॉ'ने म्हटले आहे. दरम्यान, उद्या निकाल लागणार असल्याचं समोर येताच, राजकीय नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. (Breaking Marathi News)

Devendra Fadnavis on CM Eknath Shinde Resign Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टाने निर्णय अध्यक्षांकडे सोपवला तर काय होईल? नरहरी झिरवळ यांनी स्पष्टच सांगितले...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या उद्या येणाऱ्या निकालावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही आशावादी आहोत, कारण आमची केस मजबूत आहे. त्यामुळे योग्य निकाल येईल तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे गांभीर्याने पाहिलं पाहीजे , त्याबद्दल अंदाज लावणं योग्य नाही. पण आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत", असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.  (Maharashtra Political News)

CM शिंदेंच्या राजीनाम्यावर फडणवीसांचं भाष्य

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या राजीनाम्यावर देखील मोठं भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निकालापूर्वी राजीनामा देतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे . मात्र यादरम्यान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री शिंदे पदाचा राजीनामा देणार नाहीत आणि सरकार स्थिर असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Devendra Fadnavis on CM Eknath Shinde Resign Maharashtra Political Crisis
Supreme Court Hearing on ShivSena: सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी चंद्रकांत खैरेंचं होम हवन; भद्रा मारोतीला घातलं साकडं

'CM शिंदे कशासाठी राजीनामा देतील?'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वीच राजीनामा देण्याच्या शक्यतेवर बोलताना देवेंद्र फडणवीस चिडल्याचं पाहायला मिळालं. फडणवीस म्हणाले की, "माफ करा पण शब्द वापरतो, पण मूर्खांचा बाजार आहे. यापेक्षा जास्त काही बोलू शकणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशासाठी राजीनामा देतील? त्यांनी काय चूक केली आहे?, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. मी तुम्हाला दाव्याने सांगतो की पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढू. सरकार एकदम स्थिर आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com