Maratha Aarakshan  Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह पिटीशनबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, राज्य सरकारकडून याचिका दाखल

Supreme Court On Maratha Aarakshan : मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर 20 एप्रिल 2023 ला वाजता सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेवर चर्चा झाली होती.

प्रविण वाकचौरे

प्रमोद जगताप

New Delhi News :

मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मराठा आरक्षणाबाबत क्युरेटीव्ह पीटीशनबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. मराठा आरक्षणावर सुनावणी घ्यायची की नाही यावर उद्या होणार निर्णय होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात क्युरिटीव्ह पिटीशन मांडण्याचा प्रयत्न 13 ऑक्टोबरला करण्यात आला होता. मात्र त्यावेळी कोर्टाने आम्ही योग्यवेळी दाखल करून घेऊ, असं सांगितलं होतं. अॅड मनिंदर सिंह यांनी पिटीशन दाखल करण्याचा प्रयत्न केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर आता उद्या ही पीटिशन लिस्टेड झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली होती. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर 20 एप्रिल 2023 ला वाजता सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेवर चर्चा झाली होती.

चर्चेदरम्यान मराठा आरक्षणाचा निकाल देणारे सर्व न्यायाधीश देखील उपस्थित होते. न्यायालयाने दिलेल्या निकालावर पुनर्विचार करणं का गरजेचं आहे? यावर चर्चा झाली. त्यानंतर या याचिकेवर झालेल्या चर्चेनंतर सुनावणी घ्यायची की नाही यावर न्यायाधीश चर्चा करून निर्णय देणार होते.

त्यानंतर हे प्रकरण कोणत्या घटनापीठाकडे वर्ग करायचे (काही न्यायाधीश निवृत्त) याचा निर्णय सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड घेणार होते. मात्र, मराठा आरक्षणाबाबतची रिव्ह्युव्ह पीटीशन फेटाळल्यानं घटनापीठ तयार करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.

EWS आरक्षण देताना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. अशी भूमिका याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडण्यात येणार होती. मात्र न्यायालयाने या प्रकरणात ही पुनर्विचार याचिका फेटाळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heat stroke symptoms: हीट स्ट्रोक की हार्ट अटॅक...! कसा ओळखाल दोघांमधील फरक?

MLC Election Update : 'हा' उमेदवार जळगावात सर्वात श्रीमंत, किती आहे संपत्ती? आकडे वाचून फुटेल घाम

Maharashtra News Live Update: रायगडच्या निजामपुरमध्ये दुषित पाण्याचा पुरवठा

money laundering case : राज कुंद्रा यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून परदेश प्रवासाची परवानगी

प्रेग्नेसीमध्ये योगा करू शकतो का? प्रसूती सुलभ होण्यासाठी कोणती योगासने ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT