SC On Bhagat Singh Koshyari
SC On Bhagat Singh Koshyari Saam Tv
महाराष्ट्र

SC On Bhagat Singh Koshyari: राज्यपालांनी अधिकारांचा अमर्याद वापर केला, भगतसिंह कोश्यारींच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने ओढले ताशेरे

Priya More

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबच सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने आपली निरिक्षणं मांडली आहेत. यावेळी सुप्रीम कोर्टाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. 'राज्यपालांनी अधिकारांचा अमर्याद वापर केला.', असे सांगत सुप्रीम कोर्टाने त्यांना खडेबोल सुनावले आहेत. (Latest Marathi News)

सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान पहिली तीन निरीक्षणं ठाकरे गटाच्या वतीने मांडली. राज्यपालांनी अधिकारांचा अमर्याद वापर केल्याचे मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नोंदवत त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारीच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज्यपालांच्या समोर सरकार अल्पमतात आल्याचा कुठलाही ठोस आधार नसताना एकनाथ शिंदेना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवणं हे अयोग्य, असल्याचे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे. तसंच, शिवसेना पक्षाचे अंतर्गत वाद सोडवण्यासाठी राज्यपालांनी त्यांचे अधिकार वापरण अयोग्य आहे. राज्यपालांनी अधिकारांचा चुकीचा वापर केला.' असे देखील सुप्रीम कोर्टाने सांगितले.

दरम्यान, गेल्या 10 महिन्यांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय सुनावला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वळवण्यात आले आहे. याप्रकरणी निकाल वाचताना सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आल्याचे सांगितलं. तसेच याप्रकरणी नवाब रेबिया प्रकरण लागू होत नाही, असं ही या घटनापीठाने स्पष्टपणे सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: मृणालच्या नखरेल अदा; पाहा खास फोटो

Bike Stunt Video : बाईक स्टंटच्या नादात भीषण अपघात; गर्लफ्रेंडसोबत तरुण धाडकन खाली आदळला, पाहा VIDEO

T20 World Cup 2024: जय शहांची मोठी भविष्यवाणी! म्हणाले, टीम इंडियासह हे ३ संघ गाठणार सेमीफायनल

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ खरंच नाराज? भुजबळांची भेट घेत गिरीश महाजनांनी सांगितलं खरं कारण

Sangli : 'शिवप्रतिष्ठान'ची प्रशासनास दाेन दिवसांची मुदत, सांगली बंदचा दिला इशारा;जाणून घ्या नेमकं कारण

SCROLL FOR NEXT