bullock cart race 
महाराष्ट्र

वकीलांच्या जिगरी प्रयत्नांमुळे न्याय मिळाला : सुनील केदार

ज्यांनी ज्यांनी या प्रकरणात राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना आज उत्तर मिळाले आहे असे मंत्री केदार यांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : बैलगाडा शर्यतींना (Bullock Cart Race) मिळालेली परवानगी ही महाविकास आघाडीच्या (mva) सरकारचा विजय आहे. राज्याने नेमलेल्या वकीलांनी जिगरी प्रयत्न केले. यामुळेच महाराष्ट्रातील (maharashtra) शेतक-यांना (farmers) न्याय मिळाला आहे. आता देशात एक न्याय आणि महाराष्ट्रात एक न्याय ही परिस्थिती दूरावली आहे अशी भावना पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार (sunil kedar) यांनी सर्वाेच्च न्यायालयाने (supreme court) बैलगाडा शर्यतींच्या बाबतीत दिलेल्या निकालाबाबत व्यक्त केली.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने (maharashtra state government) दाखल केलेल्या याचिकेवर आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी झाली. यामध्ये बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी आणि नियम घालून परवानगी दिली आहे.

राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार या निर्णयावर खूप आनंदित झाले हाेते. ते म्हणाले हा विजय महाविकास आघाडीच्या सरकारचा आहे. राज्याने नेमलेल्या वकीलांनी जिगरी प्रयत्न केल्यानेच आज शेतक-यांना न्याय मिळाला आहे. न्यायालयात शासनाची भक्कमपणे बाजू मांडणारे महाधिवक्ता मुकुल रोहतगी, आशुतोष कुंभकोणी, अधिवक्ता सचिन पाटील यांचे मी आभार मानताे.

या पुढं देखील अशाच प्रकारे लाेकांचे जनकल्याणाचे काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून केले जाईल अशी ग्वाही पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली. ज्यांनी ज्यांनी या प्रकरणात राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना आज उत्तर मिळाले आहे असा समाचार देखील मंत्री केदार यांनी विराेधकांचा घेतला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सौरमालेतील कोणत्या ग्रहावर दिवस सर्वात मोठा असतो?

Maharashtra Politics : भाजपच्या ऑपरेशन लोटसला ब्रेक लावण्यासाठी अजित पवारांची मोठी खेळी; थेट मंत्री मैदानात उतरवला

राग आल्यानंतर चेहऱ्याचा रंग लाल का होतो?

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

६० लिटर पाण्यात ९०० किमी धावणार कार? इराणच्या वैज्ञानिकाचा व्हिडिओ व्हायरल, वाचा नेमकं सत्य काय

SCROLL FOR NEXT