crime
crimeSaam Tv

वेश्या व्यवसायास भाग पाडल्याने शबानाने हनुमंतचा काढाला काटा

दाेघांचे दहा वर्षापासून अनैतिक संबंध हाेते.
Published on

लातूर (crime) : लातूर (latur) जिल्ह्यातील चाकूर (chakur) पोलिस ठाण्याच्या हद्दीत आष्टा व मोहदळ सीमेवर झालेल्या एका खूनाचा उलगडा पाेलिसांनी नुकताच केला. या घटनेतील एक महिला आणि दाेन पुरुष असे तिघा संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. या खूनाच्या घटनेची माहिती मिळताच चाकूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून चाकुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालाजी मोहिते व अंमलदार यांना तपासाबाबत सूचना दिल्या हाेत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक मोहिते व त्यांचे अंमलदार यांनी शासकीय पंचा समक्ष पंचनामे करून चाकुर शहरातील नागरिकांच्या मदतीने मयताची ओळख निष्पन्न केली असता तो चाकूर येथील हनुमंत व्यंकट येरवे (वय ४०, राहणार चाकूर, जिल्हा लातूर) यांचा असल्याचे समजले हाेते.

crime
काेराेनाने मृत झालेल्या वारसांना ५० हजारांची मदत; इथं करा अर्ज

चाकुर पोलिसांनी तपासासाठी पथक तयार करून खुनाचे कारण व आराेपींचा शोध सुरु केला. यावेळी मिळालेल्या माहितीनंतर पाेलिसांनी लातूररस्ता येथील शबाना मासुलदार या महिलेस ताब्यात घेतली. तिची कसून चाैकशी केली. या चाैकशीत गेल्या दहा वर्षापासून हनुमंत यांच्याशी तिचे अनैतिक संबंध हाेते असे निष्पन्न झाले. त्याची कबूली तिने दिली. ती पतीपासून विभक्त होऊन लातूररोड येथे राहत हाेती. काही दिवसांपासून हनुमंतने तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे पाेलिसांनी सांगितले. त्यातून मिळणारे पैसे ताे दारूसाठी वापरत असे. पैसे नाही दिले तर जबर मारहाण करीत होता. त्याच्या या त्रासापासून सुटका करून घेण्याकरिता नव्याने संबंध प्रस्थापित झालेल्या एका युवकाच्या मदतीने तिने हनुमंतचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला असे पाेलिसांनी नमूद केले.

ग्राहकाकडे जायचे आहे असे सांगून तिने हनुमंतला दुचाकीवरुन चाकूर ते लातूर जाणारे आष्टा शिवारातील मोहदळ व आष्टा शिव वाटेवर निर्जन ठिकाणी नेले. त्या ठिकाणी संतोष धोंडीराम घाडगे आणि लक्ष्मण बब्रुवान डांगे हे दाेघे उपस्थित हाेते. हनुमंत यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्या डोक्यात जाड लोखंडी रॉड घालून त्याचा काटा काढला असे पाेलिसांनी नमूद केले.

पोलीस निरीक्षक मोहिते व त्यांचे अंमलदार यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली शिवनखेड येथून संतोष घाडगे व आष्टा शिवारातील आखाडयावरून लक्ष्मण डांगे यांना ताब्यात घेतले. या दाेघांनी हनुमंतला मारल्याची कबूली देत शबाना मासुलदार हिच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचे पाेलिसांना सांगितले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com