superstition saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election 2023 : सांगलीत ग्रामपंचायतीवर ताबा मिळवण्यासाठी अघोरी कृत्य

या घटनेनंतर अद्यापही दाेन्ही पॅनल प्रमुखांनी पाेलीसांत तक्रार दिलेली नाही.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील हरिपुरात ग्रामपंचायत निवडणुकीत (Grampanchayat Election 2023) काळ्या जादूचा वापर झाल्याची चर्चा आहे. अज्ञाताकडून काळ्या बाहुल्यांची पूजा केली गेली तर मोहिते पॅनलच्या कार्यकर्त्यांनी त्या बाहुल्या जाळून टाकल्या. दरम्यान या घटनेबाबत पाेलीसांत नाेंद झालेली नाही. (Maharashtra News)

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयासाठी सध्या टोकाचे प्रयत्न केले जात आहेत. सांगली नजीकच्या हरिपुरात निवडणुकीत चक्क काळ्या जादूचा वापर केला जात आहे. अज्ञाताकडून हरिपूरमध्ये बाहुल्यांची पूजा मांडण्यात आली.

यानंतर संतप्त मोहिते पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जादूटोणा केलेल्या बाहुल्या जाळून निषेध केला. हरिपूर ग्रामपंचायतीसाठी निवडणूक सुरू आहे. यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. सध्या ग्रामपंचायतीवर तांबवेकर प्रणित बोंद्रे पॅनेलची सत्ता होती. सत्ताधारी गटाची सत्ता उलथवून लावण्यासाठी मोहिते पॅनल रिंगणात आहे.

यातून आरोप प्रत्यारोप सुरू आहेतच मात्र रात्री हरिपूर येथे एका ठिकाणी काळ्या बाहुलीची जादू सर्वांना धक्का देणारी ठरली. एका घराच्या बाहेर सात बाहुल्या पुजून ठेवण्यात आल्याने खळबळ उडाली. निवडणुकीच्या विजयासाठी काहींनी हा प्रकार केल्याचा आरोप मोहिते पॅनलकडून करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काळी जादू करून निवडणुका जिंकू पाहणाऱ्या विरोधकांना चपराक म्हणून मोहिते पॅनलकडून या बाहुल्या जाळून अंधश्रध्देला तिलांजली देण्यात आली अशी माहिती अशोक भाऊ मोहिते,(पॅनल प्रमुख) यांनी दिली. तर अशी काळी जादू करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सत्तारूढ बोंद्रे पॅनलकडून अरविंद तांबवेकर (बोंद्रे पॅनल प्रमुख) यांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT