ncp political news  Saam tv
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठं अडलं? दादांच्या राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका, VIDEO

ncp political news : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं घोडं नेमकं कुठं अडलंय? विलिनीकरण होणार की नाही? दादांच्या राष्ट्रवादीनं नेमकी काय भूमिका मांडलीय... पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुरु झालेल्या विलिनीकरणाच्या चर्चेला पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी फुल स्टॉप दिला... मात्र त्यानंतरही विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरलाय..कारण दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात बोलताना लिखीत प्रस्ताव आल्याशिवाय विलिनीकरण होणार नाही, अशी थेट भूमिका घेतलीय..

खरं तर दादांच्या मृत्यूनंतर विलिनीकरणाची चर्चा सुरु झाली.. त्याला खुद्द शरद पवारांनीच सुरवात केली .पवारांनी दादांसोबतच्या बैठकीत ठरलेली विलिनीकरणाची तारीखही सांगितली होती... त्यावरुन दावे प्रतिदावे रंगले.. दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची घाई का? असा सवाल उपस्थित करत पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं व्हिलिनीकरण सुरु केलं... त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी थेट विलिनीकरणाला फुल स्टॉप दिल्याचं वक्तव्य केलं...

दरम्यान दादांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामुळेच विलिनीकरण रखडल्याचेही आरोप सुरु झाले... त्यामुळेच तटकरेंनी आता विलिनीकरणाचा लिखित प्रस्ताव आल्यास निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय..

त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीनं विलिनीकरणाबाबत घेतलेली भूमिका विलिनीकरण टाळण्याचा डाव आहे का? याबरोबरच सुनेत्रा पवारांकडे पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिल्यानंतर त्या विलिनीकरणाच्या बंद पडलेल्या चर्चेला पुन्हा सुरुवात करणार का? आणि पक्षाची ताकद वाढवण्याबरोबरच कुटुंब एक आहे हा संदेश देण्यासाठी विलिनीकरणाचा निर्णय घेणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update: राज्यात आठ दिवस मुसळधार पाऊस; नदी नाल्यांना येणार पूर

Fact Check: E20 पेट्रोल वापराल, विम्याला मुकाल? गाडीचं नुकसान झाल्यास भरपाई नाही?

Today Horoscope : वृश्चिक राशीसाठी तिप्पट लाभाचा महासंयोग, मकर-मीन राशीत प्रेमाचा वर्षाव; जाणून घ्या तुमचे भविष्य

ठाकरेसेनेचा पुन्हा पोपट मेला, ठाकरेसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT