Sharad pawar  Saam tv
महाराष्ट्र

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, ताकद सर्वत्र; कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा डंका? VIDEO

maharashtra ncp politics : राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु असताना झेडपीच्या निकालानंतर राष्ट्रवादीची एकी किती फायदेशीर ठरू शकते, हे आता अधोरेखित होतयं... त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींचा डंका नेमका कोणत्या जिल्ह्यात पाहायला मिळाला.. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

अजितदादांच्या निधनानंतर झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादीनं थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीय.... महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची नाडी समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढली... आणि याचं एकीमुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी विरोधकांपुढे कसं आव्हानं उभं राहणार पाहूयात...

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीत झालेल्या छुप्या समझोत्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीनं 51 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 1 जागेवर विजय मिळवत भाजपला अवघ्या 10 जागांवर रोखण्यात यश मिळवल..

कोल्हापूरातही दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर निवडणुकीला सामोरी गेली आणि..भाजप आणि काँग्रेसला मागे टाकत अजित पवारांच्या राष्ट्रवादीन 20 जागांवर विजय मिळवला.

सांगली जिल्हा परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या नसल्या तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 6 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 18 जागांवर विजय मिळवलाय... याउलट भाजप फक्त 16 जागांवर विजय मिळवू शकलीय.. तर काँग्रेस 11, शिंदेसेनेला 7 जागांवर समाधान मानावं लागलयं.

सोलापूरातही काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुकीला सामोरं गेल्या...त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 11, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 5 जागा मिळाल्या... तर भाजपला सर्वाधिक 38 जागा मिळाल्या...

साताऱ्यातही दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र आल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी 20 जागांवर विजय मिळवू शकलीय.. तर भाजपने 27 आणि शिदेसेनेने 15 जागांवर विजय मिळवलाय...

त्यामुळे भविष्यात परभणी,धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची एकत्र आल्यास विरोधकांपुढे मोठं आव्हानं निर्माण होऊ शकतो.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही गट आमनेसामने न आल्यानं विरोधकांना चांगलाच फटका बसलाय.. तसचं घड्याळ चिन्हामुळे मतदारांमधील संभ्रमही दूर झाला...त्यामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ते राजकारणात धुरंधर ठरण्याची शक्यता आहे हे या निकालांनी सिद्ध केलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात बड्या महिला नेत्या; निवडणुकीत विजयासाठी 'अघोरी' विद्येचा आधार? लवकरच होणार चौकशी

Sakhe Ga Sajani: तीन मित्रांच्या प्रवासाची भन्नाट कहाणी; अभिजीत खांडकेकर आणि पूजा सावंतच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Reception Saree Look : इव्हनिंग रिसेप्शनला नेसा स्टायलिश साडी; पाहा सुंदर डिझाइन्स, सर्व पाहुण्यांमध्ये तुम्हीच उठून दिसाल

Amruta Khanvilkar: ब्लॅक साडीत अमृता खानविलकरचे सौंदर्य खुललं; पाहा Photo

Railway News : मुंबई पुणेकरांसाठी गूड न्यूज! उन्हाळ्याच्या सुट्टीला आरामात जा गावाकडे, रेल्वेकडून नव्या गाड्यांची घोषणा, वाचा

SCROLL FOR NEXT