Sunetra Pawar on maharashtra budget session  Saam tv
महाराष्ट्र

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

Sunetra Pawar on maharashtra budget session : अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार यांनी माधम्यांशी संवाद साधला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील भाष्य केलं.

Vishal Gangurde

राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार

अधिवेशनापूर्वी राज्य सरकारची पत्रकार परिषद पार पडली

सरकारच्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला

राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. या अधिवेशनाआधी महायुती सरकारची पत्रकार परिषद पार पडली. अधिवेशनाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सरकारची भूमिका मांडली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवारांनी राज्याचा ११ वेळा अर्थसंकल्प सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून जनतेला न्याय देणार असल्याचं सांगितलं. सुनेत्रा पवार म्हणाल्या, 'यंदाच्या महायुती सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. मोठ्या विश्वासाने जनतेनं साथ दिली. महायुतीला सत्ता दिली. त्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. अजितदादांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला'.

'अजित पवारांनी २०११ साली पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर २०२५ मध्ये त्यांच्या कारकि‍र्दीत शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील झालेली वाढ आपल्याला महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकडे न्यायची आहे. अजितदादांनी आर्थिक शिस्तीशी कधीही तजजोड केलेली नाही. त्यांनी विकासाशी समतोल राखला, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

' अजितदादांच्या कारकि‍र्दीतला १२ वा अर्थसंकल्प ठरला असता. मात्र, ते अचानक आपल्यांना सोडून गेले. त्यांच्या पश्चात अर्थसंकल्पाची तयारी झाली आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ बिलीयन डॉलर नेण्याचा अजितदादांचा ध्यास होता.त्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील होते. आर्थिक शिस्त आणि विकासाचा समतोल हेच त्यांच्या कार्याचे सूत्र होतं. यंदा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करतील. अजितदादांनी लाडकी बहीण योजनेला कधीही पैसा कमी पडून दिला नाही. ही योजना त्यांनी कायम सुरू ठेवली, असेही पवारांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महागाईच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबारमध्ये आंदोलन

Chest Pain Remedies : अचानक छातीत दुखायला लागलंय? जादूप्रमाणे काम करतील 'हे' घरगुती पदार्थ, Heart Attack चा टळेल धोका

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा ट्रेनवर हल्ला, २६ जवानांचा मृत्यू, ७० गंभीर, भयावह व्हिडिओ समोर

Diabetes : लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका, 'ही' ५ लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरकडे पळा

CET मध्ये कमी गुण मिळाल्याने पुण्यातील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

SCROLL FOR NEXT