Sun Halo Viral Photo News Saam Tv News
महाराष्ट्र

Sun Halo: आकाशात दिसलं आगळंवेगळं दृश्य, सूर्याभोवतीच्या पांढऱ्या वर्तुळाची चर्चा; नेमकं आहे तरी काय?

Akkalkuwa News: अक्कलकुवा तालुक्यात आज सकाळी सूर्याभोवती पांढरं वर्तुळ दिसल्याने कुतूहल निर्माण झालं. ‘सन हॅलो’ या खगोलशास्त्रीय घटनेमुळे नागरिकांनी आकाशातला नयनरम्य चमत्कार अनुभवला.

Bhagyashree Kamble

निसर्ग सतत आपल्याला आपल्या अद्भुत चमत्कारांनी भारावून टाकतो. निसर्गरम्य गोष्टी पाहून आपण क्षणभर सगळ्या गोष्टी विसरतो. अशातच अक्कलकुवा तालुक्यातील एका गावात आकाशात आगळंवेगळं दृश्य पाहायला मिळालं. सूर्याभोवती एक स्पष्ट आणि चमकदार पांढरं वर्तुळ दिसलं. ही दृष्य अनेकांनी कॅमेऱ्यात कैद केली. तसेच सोशल मीडियात शेअर केली आहेत.

अक्कलकुवा तालुक्यात आज सकाळी आकाशात एक आगळंवेगळं दृश्य पाहायला मिळालं. सूर्याभोवती एक चमकदार, पांढरं वर्तुळ दिसून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झालं. या दृश्याला ‘सूर्य कडे’ किंवा ‘सन हॅलो’ असं म्हटलं जातं. ही केवळ एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे. जेव्हा वातावरणातील बर्फाच्या स्फटिकांमधून सूर्यप्रकाश जातो, तेव्हा प्रकाशाचं अपवर्तन होतं.

सोप्या भाषेत सांगायचं तर, हे बर्फाचे स्फटिक लहान प्रिझमसारखे काम करतात. सूर्यप्रकाशाला वाकवून एका वर्तुळाकार रिंगमध्ये परावर्तित करतात. हे स्फटिक सहसा वातावरणातील उंच असलेल्या सायरस ढगांमध्ये आढळतात. विशेष म्हणजे, सूर्यप्रकाश या षटकोनी बर्फाच्या स्फटिकांमधून जाताना, २२ अंशांच्या विशिष्ट कोनात अपवर्तित होतो.

यामुळे सुर्याभोवती हे गोल वर्तुळ तयार होतं. अनेकदा या वर्तुळात इंद्रधनुष्यासारखे रंगही दिसतात. पावसाळ्यात किंवा वातावरणात आर्द्रता जास्त असताना अशी दृश्यं अधिक प्रमाणात दिसतात. या सन हॅलोचा आतील भाग अनेकदा बाहेरील आकाशापेक्षा गडद दिसतो. कारण प्रकाश मध्यभागी वाकत नाही अक्कलकुवा येथे दिसलेलं हे मनमोहक दृश्य केवळ एक खगोलशास्त्रीय चमत्कार होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT