Nashik Graduate Constituency Election, Sujay Vikhe - Patil, Satyajeet Tambe saam tv
महाराष्ट्र

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर निवडणुकीत संधीचं सोनं करणार : सुजय विखे- पाटील

खासदर सुजय विखे पाटील यांनी आज नगर येथे माध्यमांशी संवाद साधला.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजप कुणाला पाठिंबा देणार याबाबत पक्षाने अद्यापही अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. मात्र नगरचे खासदार सुजय विखे पाटील (sujay vikhe patil) यांनी भुमिपुत्राच्या पाठीशी उभं राहणार असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. नगर जिल्ह्यातील भाजपा (BJP) कार्यकर्ते सत्यजित तांबेंना (Satyajeet Tambe) पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले पाठिंब्याबाबत पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही, मात्र आम्ही आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही भूमिपुत्र म्हणजेच जिल्ह्यातील उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणार आहे. (Maharashtra News)

दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवाराला पाठिंबा का द्यावा अशी जिल्ह्यातील भाजप (bjp) कार्यकर्त्यांची भावना असल्याने त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष आणि फडणवीसांना सांगणार आहोत असेही विखे यांनी नमूद केले. पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे जिल्ह्याला जर चांगली संधी मिळत असेल तर त्याचं सोनं केलं जाईल असे सूचक वक्तव्य करत खासदर सुजय विखे पाटील यांनी सत्यजित तांबेंच्या पाठीशी उभं राहण्याचे सुतोवाच केलेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

Raj Thackeray Speech : उद्धव ठाकरे यांच्या जागी मी असतो तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले,VIDEO

Ranveer Singh: रणवीर सिंह निभावतोय डॅडी ड्युटीज; आनंद व्यक्त करताना अभिनेत्याला शब्द सुचेना

Maharashtra News Live Updates: येवला तालुक्यातील पाटोदामध्ये भुजबळ-जरांगे पाटील समोरासमोर येणं टळलं

SCROLL FOR NEXT