Sujay Vikhe patil  saam tv
महाराष्ट्र

Sujay Vikhe-Patil News: विरोधकांंनी लोक सांभाळण्यासाठी 'इंडिया' नावाचा फड उभा केलाय; सुजय विखे पाटील यांची टीका

Sujay Vikhe-Patil News: विरोधकांनी लोक कसे सांभाळून ठेवायचे यासाठी त्यांनी हा एक फड उभा केला आहे. अशा शब्दात भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी टीका आहे.

Vishal Gangurde

सुशील थोरात

Sujay vikhe-Patil News: भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'विरोधकांकडे आता कोणताही अजेंडा नाही. यांच्याकडे लोक शिल्लक नाहीत, ते लोक कसे सांभाळून ठेवायचे यासाठी त्यांनी हा एक फड उभा केला आहे. अशा शब्दात भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी टीका आहे. (Latest Marathi News)

भाजप खासदार सुजय विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. दरम्यान, कर्जत जामखेड तालुक्यातील एमआयडीसीबाबत सध्या चांगलाच वादविवाद सुरू आहे. या वाद-विवादावर खासदार सुजय विखे पाटील यांनी बोलण्यास टाळले आहे.

एमआयडीविषयी भाष्य करताना विखे पाटील म्हणाले, 'एमआयडीसी उभारण्या आधी कोणत्या कंपन्या या ठिकाणी येण्यास उत्सुक आहेत याची शहानिशा करावी आणि त्या कंपन्यांना आणि नागरिकांना विश्वास दिला तरच पुढील काळात एमआयडीसी चांगल्या पद्धतीने चालू शकेल, पुढील काळात एमआयडीसी चांगल्या पद्धतीने चालू शकेल. त्यामुळे उद्योगमंत्री असतील किंवा त्या परिसरातील लोकप्रतिनिधी असतील यांनी सर्वात आधी कंपन्या किती आणि कोणत्या येणार याबाबत नागरिकांना विश्वास द्यावा, तरंच हा विषय मार्गी लागू शकतो, असं खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं.

यावेळी सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. सुजय विखे पाटील म्हणाले, 'भाजपा विरुद्ध विरोधकांनी इंडिया नाव लावल्याने विरोधक पारदर्शक होत नाहीत. आतंकवादी संघटनेने देखील इंडिया नाव लावल्याचे उदाहरण आहेत, अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली.

भाजप विरुद्ध सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया नाव देत आघाडी स्थापन केली आहे. मात्र विरोधांची एकजूट राहिलेली नसून इंडिया नाव देणे हेच मुळात चुकीचं असून कुणीही देशाचं नाव वापरू शकत नाही, हा फक्त टाईमपास सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, देशाचं नाव लावलं म्हणजे ते देशाचं काही भलं करतील असे नाही, त्याचे उदाहरण आणि दाखले देखील प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेली आहेत, असे विखे पाटील म्हणाले.

'आतंकवादी संघटनेने देखील इंडियन मुजहिद्दीन असे नाव दिले होते. मात्र त्यापासून नुकसानच झालेले आहे. इंडिया ईस्ट कंपनीने भारतावर राज्य केले, त्यामुळे अनेकांनी या आधी इंडिया नाव लावले आहे. त्याच्यामुळे नुकसानच झाले आहे , असे दाखले देशाने पाहिले आहेत. त्याचप्रमाणे विरोधकांची वाटचाल सुरू आहे, यांचा कोणताही अजेंडा नाही. यांच्याकडे लोक शिल्लक नाहीत, ते लोक कसे सांभाळून ठेवायचे यासाठी त्यांनी हा एक फड उभा केला आहे, अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT