Sambhaji Bhide News: संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल, महात्मा गांधींबद्दलचं वक्तव्य भोवलं; काँग्रेसकडून अटकेची मागणी

Sambhaji Bhide Latest News: अमरावतीतीत राजापेठ पोलिसांनी कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे यांना अटक करा अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.
Sambhaji Bhide Controversial Statement
Sambhaji Bhide Controversial Statementsaam tv
Published On

Amravati Police Case Registered Against Sambhaji Bhide: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्यानंतर आता संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अमरावतीतीत राजापेठ पोलिसांनी कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे यांना अटक करा अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे आणि त्यांची वादग्रस्त वक्तव्य हे समीकरण आता काही नवे राहिले नाही. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीविरोधात वादग्रस्त विधान केलं. ज्यावरून आता काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यभरात आंदोलने केली जात आहे.

Sambhaji Bhide Controversial Statement
Uddhav Thackeray News: CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; मेळाव्याची जय्यत तयारी सुरू

पुण्यातही काँग्रेसच्या नेत्यांनी भिडेंविरोधात आंदोलन सुरू केलं असून त्यांच्या पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने फडके हौद चौक येथे संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत असून यावेळी कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे.

दुसरीकडे कोल्हापुरात सुद्धा भिंडे यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते.

Sambhaji Bhide Controversial Statement
Malkapur Bus Accident: बुलढाणा ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांचा आकडा वाढला; ६ प्रवाशांची ओळख पटली

दरम्यान, यवतमाळ शहरात संभाजी भिडे यांचे व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तत्पूर्वी शहरात त्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फडणाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहरात चांगलंच वातावरण तापलं आहे. आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या व्याख्यानाचे पोस्टर फाडल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

संभाजी भिडे यांना अटक करा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

दरम्यान, भिडे यांच्या वक्तव्याचे शुक्रवारी ( २८ जुलै ) विधानसभेत देखील पडसाद उमटले. विरोधी पक्षातील नेत्यांनी यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली. “संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंनी कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे. अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ते करत आहेत.”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com