Malkapur Bus Accident: बुलढाणा ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांचा आकडा वाढला; ६ प्रवाशांची ओळख पटली

Buldhana Bus Accident Latest News: बुलढाणा मलकापूर ट्रॅव्हल अपघातातील ७ मृतांपैकी ६ प्रवाशांची ओळख पटली आहे.
Buldhana malkapur Bus Accident Latest Marathi News
Buldhana malkapur Bus Accident Latest Marathi NewsSaam TV
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Malkapur Bus Accident: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २५ ते ३० प्रवाशांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू असून अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अपघातातील ७ मृतांपैकी ६ प्रवाशांची ओळख पटली आहे.

Buldhana malkapur Bus Accident Latest Marathi News
Malkapur Bus Accident: बुलढाण्यात दोन खासगी बसची समोरासमोर धडक, ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू; अंगाचा थरकाप उडवणारे PHOTOS

संतोष जगताप (बसचालक वय 45 वर्ष, राहणार भाडेगाव, हिंगोली), शिवाजी धनाजी जगताप (वय 55 वर्ष, राहणार भांडेगाव, हिंगोली), राधाबाई सखाराम गाडे (वय 50 वर्ष, जयपूर ता.हिंगोली), सचिन शिवाजी माघाडे (वय 28 वर्ष राहणार लोहगाव, हिंगोली), अर्चना घूकसे (वय 30 वर्ष, रा. लोहगाव ता. हिंगोली) आणि कान्होपात्रा टेकाळे ( वय 40 वर्ष, रा. केसापुर ता. हिंगोली) अशी मृतांची नावे आहेत.

याव्यतिरिक्त आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून त्याचे नाव अद्यापही समोर आलेलं नाही. मृत्युमुखी पडलेले सर्व रहिवाशी हे हिंगोली जिल्ह्यातील आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर मलकापूर तसेच गंभीर जखमींवर बुलढाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Buldhana malkapur Bus Accident Latest Marathi News
Bhor Car Accident News: घाटात फिरण्यासाठी गेले अन् मृत्यूने कवटाळलं; निरादेवघर धरणात कार कोसळून तिघांचा मृत्यू

अपघात नेमका कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, अमरनाथ येथून ३५ ते ४० प्रवाशांना घेऊन खासगी बस हिंगोलीच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी दुसरी बस नागपूरवरून २५ ते ३० प्रवाशांनी घेऊन नाशिकच्या दिशेने येत होती.

दरम्यान, दोन्ही बस मलकापूर शहरातून (Buldhana Accident News) जाणाऱ्या हायवे क्रमांक सहा वरती समोरासमोर धडकल्या. हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही ट्रॅव्हल्सचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातत ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्स मधील ते २० ते २५ प्रवासी जखमी आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com