Suicide : त्रास देणाऱ्यांची नावं WhatsApp Statusला ठेवून; 24 वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या ! SaamTV
महाराष्ट्र

Suicide : त्रास देणाऱ्यांची नावं WhatsApp Statusला ठेवून; 24 वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या !

आदित्यच्या मित्रानी त्याचा स्टेटसला बघून त्याच्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आदित्यने आपले जीवन संपवले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इचलकरंजी : सतत खंडणीची Ransom मागणी होत असल्याने खंडणीखोरांच्या त्रासाला कंटाळलेल्या एका 24 वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्त्या Suicide केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इचलकरंजी Ichalkaranji मधील जवाहरनगर येथे राहत असणाऱ्या आदित्य बळवंत महाद्वार (Aditya Balwant Mahadwar) या तरुणाने जर्मनी गँगकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे, आदित्यने आत्महत्या करण्यापुर्वी जर्मनी गँगकडून Germany Gang आपल्याकडे सतत होणाऱ्या त्रासाबाबतती सर्व घटना एका चिठ्ठीवरती लिहून त्याने ती आपल्या व्हाटस्अँप स्टेटसला WhatsApp status टाकली होती. दरम्यान आदित्यच्या मित्रानी त्याचा स्टेटस बघून त्याच्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आदित्यने आपले जीवन संपवले होते.

हे देखील पहा -

सदरची घटना रविवारी रात्री घडली घडली असून याबाबतचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र या घटनेसंदर्भात दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता तसेच या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

आदित्य आपल्या आई, वडिलांबरोबर जवाहरनगर मध्ये राहत होता. तो अकौंटिंगचे काम करायचा मात्र रविवारी दुपारी त्याने घरात गळफास घेवून आत्महत्त्या केली. आत्महत्त्येच्या काही तास आधी आदित्यने मोबाईलवरती एका चिठ्ठीचा फोटो स्टेटसला ठेवला होता त्यामध्ये त्याने त्या चिठ्ठीमध्ये जर्मनी गँगमधील चार जणांची नावे लिहून याआधी आपल्याकडून या गँगने 25 हजार रुपये व सोन्याची अंगठी घेतल्याचे लिहले आहे. तसेच आणखी खंडणी न दिल्यास कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे आपण आत्महत्या करत आहे असे लिहून चिठ्ठीवरती आपली स्वाक्षरी करुन त्याने गळफास घेतला. दरम्यान त्याने लिहलेली चिठ्ठी सोशल मिडीयावरती Social Media मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT