Sugar Industry Salary Hike Saam Tv
महाराष्ट्र

Sugar Industry Salary Hike: साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना खूशखबर, पगारात तब्बल १० टक्के वाढ

Sugar Industry Salary Hike In Maharashtra: साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता साखर कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

Siddhi Hande

साखर कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांची पगारवाढ

कर्मचाऱ्यांच्या पगारात १० टक्क्यांची वाढ

राज्यातील साखर कारखान्यांच्या कामगारांच्या वेतनात 1 एप्रिल 2024 पासून दहा टक्के दरवाढ देण्यावर शिक्कामोर्तब झाले असून या निर्णयाचा फायदा सहकारी व खाजगी कारखान्यातील दीड लाख साखर कामगारांना होणार आहे. साखर कामगार हा साखर उद्योगाचा महत्वाचा घटक असून या वेतनवाढ त्रिपक्षीय करारामुळे अंदाजे 419 कोटी रुपयांचा जादा बोजा कारखान्यांवर पडणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

साखर संकुल येथे साखर कामगारांच्या प्रश्नांवर शासनाने गठित केलेल्या त्रिपक्षीय समितीची पाचवी बैठक राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष व त्रिपक्षीय समितीचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निर्णयांची माहिती देताना समितीचे सदस्य जयप्रकाश दांडेगांवकर, प्रकाश आवाडे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, राऊ पाटील, आनंदराव वायकर व अन्य कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. करारानुसार अकुशल ते सुपरवायझर पदापर्यंतच्या कामगारांना सरासरी प्रति महिना 2623 ते 2773 रुपयांपर्यंत वेतनवाढीचा निर्णय खेळीमेळीत झाला.

साखर कामगार वेतनवाढीवर पहिल्या बैठकांमध्ये एकमत होत नसल्याने याप्रश्नी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा लवाद स्थापून ते देतील तो निर्णय घेण्याचे त्रिपक्षीय समितीत ठरले. त्यानुसार शरद पवार यांच्या सूचनेनुसार दहा टक्के वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे,’ व तो सर्वमान्य झाल्याचे पी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच कामगार आयुक्त व त्रिपक्षीय समितीचे सचिव रविराज इळवे यांनी वेतनवाढ, सेवाशर्ती तसेच इतर मागण्यांबाबत सविस्तर चर्चा होऊन सामंजस्य करारास यावेळी मान्यता दिल्याचे सांगितले.

करारातील महत्वाच्या बाबी...

  • दिनांक 4 ऑक्टोबर 2021 या कराराच्या वेतनावर 10 टक्के वाढीचा निर्णय

  • वेतनवाढीत धुलाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, महागाई भत्त्याचा समावेश

  • नोकरीच्या कालावधीप्रमाणे जादा वेतनही मिळणार

  • 10 टक्के वेतनवाढ कराराचा कालावधी दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2029 पर्यंत असेल.

  • अकुशल ते निरीक्षक अशा 12 वेतनश्रेणीत कामगारांना 2,623 ते 2,773 रुपये वेतनवाढ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Bomb Threat: शाळेमध्ये बॉम्ब ठेवलाय, विद्यार्थ्याने मेल करत दिली धमकी; तपासातून धक्कादायक कारण आलं समोर

Post Office Diwali Scheme : टपाल खात्याची खास दिवाळी भेट! नोंदणी करून घरबसल्या विदेशात पाठवता येणार 'या' गोष्टी ,जाणून घ्या सविस्तर

Civic Officer Transfer: ठाकरे बंधूंचा मोर्चा आणि निवडणूक विभागातून 'त्या' अधिकाऱ्याची बदली|VIDEO

Cabinet Reshuffle : नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी; भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीसह २५ जणांचा समावेश, संपूर्ण यादी वाचा

Maharashtra Live News Update: माजी मंत्री धनंजय मुंडे परळीहून बीडकडे रवाना

SCROLL FOR NEXT