Sudhir Mungantiwar news  Saam tv
महाराष्ट्र

35 गुण मिळवणारा मेरिटमध्ये येत नाही, त्यालाही अभ्यास करावा लागतो; सुधीर मुनगंटीवारांनी कुणावर साधला निशाणा?

Maharashtra Political news : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं.

Vishal Gangurde

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता

भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे बंधूवर टीका

मुनगंटीवारांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणावर पक्षपातीपणा होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला

छगन भुजबळ ओबीसी समाजासाठी कॅबिनेटमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, असे मुनगंटीवार यांनी म्हटलं

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुका ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला आहे. 35 गुण मिळवणारा मेरिटमध्ये येत नसून त्याला अभ्यास करावा लागतो, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर निशाणा साधला.

सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. मुनगंटीवार यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. 'ते दोघेही सख्खे मावसभाऊ आहेत. ते एवढे दिवस का लावत आहेत, हेच कळत नाही. त्यांचे विचार एक आहेत. परीस असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा स्पर्श त्यांना झालाय. एकतर यायला कोणाचा आक्षेप नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पितृपक्षात त्यांची चर्चा सुरू आहे. नवरात्रापर्यंत कायमस्वरूपी एकत्र येऊन जनतेच आवाज बनावं'.

'निवडणुका जिंकायच्या असतील तर भूमिका बदलवून लोकहिताचे काम करावे लागेल. फक्त मोदींचा विरोध करून फायदा नाही. 35 मार्क घेणारा विद्यार्थी मेरिटमध्ये येत नाही. त्याला अभ्यास करावा लागतो, असे मुनगंटीवार म्हणाले.

ओबीसी-मराठा आरक्षणावरही मुनगंटीवार यांनी भाष्य केलं. 'देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला दूरदूरपर्यंत धक्का पोहचवू शकत नाही. जेव्हा काँग्रेस नेते हे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले. तेव्हा यांच्या पक्षातील काही नेत्यांनी ओबीसीमधून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या लक्षात आल्यावर देऊ नये अशी मागणी करत आहेत. ओबीसी किंवा मराठा कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर भाष्य करताना मुनगंटीवार म्हणाले, 'छगन भुजबळ ओबीसी समाजासाठी कॅबिनेटमध्ये आग्रही भूमिका मांडतात. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर तेच अधिक स्पष्ट बोलतील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ATM Slip Fraud Alert: ATM ची स्लीप फेकणं महागात पडणार? स्लीप फेकल्याने KYC हॅक होणार?

Boat Capsized: धक्कादायक! प्रवाशांनी भरलेली बोट नदीत बुडाली, ८६ जणांचा मृत्यू

Chhagan Bhujbal: सरकारनं दबावाखाली जीआर काढला, छगन भुजबळ थेटच बोलले|VIDEO

Plane Emergency Landing : महिला पायलटच्या धाडसाने विमानाचा मोठा अपघात टळला; धैर्याने ७५ प्रवाशांचे प्राण वाचवले

Maharashtra Live News Update: नागपूरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या कारला आग

SCROLL FOR NEXT