Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Maharashtra Political News : ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकांसाठी रणनिती ठरलीय... शिवतीर्थावरच्या बैठकीत नेमकं काय घडलं? कोणत्या महापालिका ठाकरे बंधू एकत्र लढवणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Uddhav Thackeray and Raj Thackeray news
Uddhav Thackeray and Raj ThackeraySaam Tv
Published On

मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपसह महायुतीतील घटक पक्षांनी कंबर कसलीय. अशातच राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय आणि त्याला कारण ठरलंय.. उद्धव ठाकरेंनी पुन्हा शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची घेतलेली भेट.. ही भेट तब्बल अडीच तास चालली.यावेळी ठाकरे बंधूंमध्ये आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती ठरल्याची चर्चा आहे.

मनसे आणि ठाकरे गट कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार, तसचं मुंबईतील दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडे निवडणुकांची जबाबदारी देण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Uddhav Thackeray and Raj Thackeray news
Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; बडा नेता भाजपच्या वाटेवर, समीकरण बदलणार?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये झालेल्या या बैठकीत ठाकरेसेनेकडून संजय राऊत आणि अनिल परब तर मनसेकडून बाळा नांदगावकर हे सहभागी झाले होते. याचं भेटीनंतर युतीबाबत दोन्ही पक्षातील नेत्यांनी सकारात्मक भूमिका मांडली.

Uddhav Thackeray and Raj Thackeray news
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाने महाराष्ट्राची चिंता वाढली, मुरबाडमधील ११२ पर्यटक अडकले

दुसरीकडे ठाकरे बंधू आता पटायला लागलं म्हणून एकत्र येतायत असा टोला विरोधकांनी लगावलाय.

मात्र ठाकरे बंधूंची कोणत्या महापालिकामध्ये युती होऊ शकते? पाहूयात..

'या' महापालिकेत होणार ठाकरेंची युती?

मनसे आणि ठाकरेसेनेत मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबई या महापालिका निवडणुकांसाठी युती होऊ शकते. त्याव्यतिरिक्त इतर महापालिका ठाकरेसेना मविआसोबत आणि मनसे स्वतंत्र निवडणुकीला समोरे जाऊ शकतो.

Uddhav Thackeray and Raj Thackeray news
Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांदा राज ठाकरेंची शिवतीर्थावर भेट घेतलीय. त्यामुळे मुंबई महापालिकेवरील 25 वर्षांची सत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून शर्थीचे प्रयत्न केले जातायत. त्याआधी राज ठाकरेंनीही मुंबई महापालिकेवर ठाकरेंचीच सत्ता यायला हवी असा कानमंत्र पदाधिकाऱ्यांना दिला होता. त्यामुळे महायुतीची कोंडी करण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकीची वज्रमूठ कायम ठेवली तर राज्यातील महापालिका युतीत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू अशी रस्सीखेच पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com