बच्चू कडू यांच्या स्वीय सहायकाची माणुसकी; पायरीवर बसून दिव्यांगाची केली मदत... जयेश गावंडे
महाराष्ट्र

बच्चू कडू यांच्या स्वीय सहायकाची माणुसकी; पायरीवर बसून दिव्यांगाची केली मदत...

राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहायक असलेले डॉ. दीपक ठाकरे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जयेश गावंडे

अकोला: शेतकरी नेते आणि आपल्या हटके आंदोलनाने संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध असलेले राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे बरेचदा प्रकाशझोतात येत असतात. मात्र त्यांचे सहकारीही काही कमी नाहीत. त्यांचे स्वीय सहायक असलेले डॉ. दीपक ठाकरे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Such is the humanity of Bachchu Kadu's secretary; Helps Her crippled by sitting on the steps)

हे देखील पहा -

अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बच्चू कडू यांचे कार्यालय आहे. साहजिकच या कार्यालयात व्यथा, समस्या घेऊन येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. दिवसभर शेकडो नागरिक आपल्या समस्यांना घेऊन पालकमंत्री कडू यांचे कार्यालय गाठतात. बच्चू कडू यांच्याकडे मदतीची आस घेऊन अनेक दिव्यांगही या कार्यालयात येतात. दरम्यान पालकमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहायक दीपक ठाकरे यांनी एका दिव्यांगांच्या मदतीसाठी कार्यालयातून बाहेर येत थेट पायरीवर बसून विचारपूस केली.

अकोल्यातील कृष्णा बोराडे नामक दिव्यांगाला पायऱ्या चढता येत नसल्याने आपली समस्या कशी मांडणार असा प्रश्न त्याला पडला. दोन्ही पाय नाही व एक हातही नसलेला हा दिव्यांग कार्यालयापर्यंत कसा बसा आला. आपल्याला तीन चाकी सायकल मिळाली तर नक्कीच त्याची मदत होईल. स्वीय सहायक असलेल्या दीपक ठाकरे यांनी त्या दिव्यांगासोबत खाली पायरीवर बसून त्याच्याशी माणुसकीचा संवाद साधला. आस्थेने विचारपूस केल्यानंतर त्याला हवी असलेली मदत देण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

बच्चू कडू यांनी राजकारणात येण्यापूर्वीपासून जोपासलेला माणुसकी आणि सेवेचा वसा त्यांच्या राज्यमंत्री होण्यानंतरही त्यांनी जोपासला. तसा तो त्यांच्या अधिनस्त काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडूनही जोपासला जाईल, याची काळजी त्यांनी घेतल्याचे या घटनेतून दिसून येते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT