Nanded Success Story Saam Tv
महाराष्ट्र

Success Story: IIT चं घेतलं शिक्षण, गांडूळ खत प्रकल्प उभारलं; आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये...

Nanded Success Story: आयआयटीचं घेतलं शिक्षण, गांडूळ खत प्रकल्प उभारलं; आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये...

साम टिव्ही ब्युरो

>> संजय सूर्यवंशी

Nanded Success Story: नांदेडमधील एका तरुणाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. आयआयटीचे उच्च शिक्षण घेतलेल्या या तरुणाने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला असून या खत निर्मितीमधून तो महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे.

नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथील हा तरुण असून या तरुणाने जवळच असलेल्या पिंपळाभत्या येथे हा प्रकल्प सुरू केला आहे. प्रज्ञानंद पोहरे असं या तरुणाचे नाव आहे. बेंगळुरू येथे सध्या तो एका कंपनीमध्ये ऑनलाईन नोकरी देखील करतो.

ऑस्ट्रेलियन प्रजातीच्या गांडूळाची शेती

नोकरी सोबतच फावल्या वेळात या तरुणाने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी त्याने हरियाणा राज्यातून ऑस्ट्रेलियन प्रजातीचे गांडूळ मागवले आहेत. या गांडूळाच्या माध्यमातून खत निर्मिती तसेच वर्मीवॉश हे फवारणी औषध तयार करण्यात येते. (Latest Marathi News)

या गांडूळ खताला मोठी मागणी आहे. या खत निर्मिती सोबतच पिकांवरील कीटकनाशकांचा  नायनाट करण्यासाठी वर्मीवॉश या फवारणी औषधाची देखील याठिकाणी विक्री केली जात आहे.

गांडूळ खत आणि वर्मीवॉश या औषधाच्या माध्यमातून प्रज्ञानंद पोहरे हा तरुण लाखो रुपयांची कमाई करीत आहे. त्याने केलेल्या प्रयोगामुळे राज्यभरात त्याच कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये खासगी शाळेच्या गोडाऊनला आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

पार्लरसारखी चमकदार त्वचा दिसेल घरी! रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'हे' तेल

BKC मधील स्कायवॉक कधी खुला होणार? अधिकृत तारीख आली समोर

Crime News: आठवीतील विद्यार्थिनीला बळजबरी दारू पाजली; नंतर हॉटेलमध्ये घेऊन गेले अन्... धक्कादायक कृत्यानं खळबळ

Dharashiv : महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेलच्या बिर्याणीत आढळलं झुरळ, ४० किमीवरून आला, एक घास खाल्ला अन् धक्काच बसला!

SCROLL FOR NEXT