India Alliance Logo: इंडिया आघाडीचा लोगो 31 ऑगस्टला होणार लॉन्च, जेवणाचा मराठमोळा मेन्यूही ठरला...

India Alliance News: इंडिया आघाडीच्या लोगोचं 31 ऑगस्टला होणार अनावरण, जेवणाचा मराठमोळा मेन्यूही ठरला
India Alliance News
India Alliance NewsSaam Tv
Published On

India Alliance Logo News: देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण 31 ऑगस्ट रोजी होणार आहे. या इंडिया आघाडीचा लोगो नेमका कसा असणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इंडिया आघाडीच्या लोगोसाठी 9 डिझाईन तयार करण्यात आले होते.

त्यातील एका डिझाईनला काही महत्त्वाच्या काही प्रमुख पक्षांनी संमती दिली आहे. फायनल झालेल्या लोगोची डिझाईन इंडिया आघाडीतील काही इतर महत्त्वाच्या पक्षांना सुद्धा दाखवून त्यांची संमती घेतली जात आहे. या इंडिया आघाडी लोगोचे अनावरण 31 ऑगस्टला रात्री होणाऱ्या बैठकीमध्ये होईल.

India Alliance News
Ajit Pawar in Beed : बीडच्या शेतकरी पुत्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना सभेआधी 6 प्रश्न, अख्ख्या बीडमध्ये बॅनरची चर्चा

या आघाडीला इंडिया नाव असल्याने या लोगोमध्ये राष्ट्रध्वजाचे तिरंगाची झलक दिसणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आघाडीतील प्रमुख पक्ष्यांच्या 11 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या बैठकीत त्या त्या पक्षाचे प्रत्येकी एक प्रमुख नेता समितीचा सदस्य असेल. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते या समितीमार्फत घेतले जातील. या बैठकीत पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात इंडिया आघाडी कडून जागा वाटपा संदर्भात चर्चा होणार आहे, असं बोललं जात आहे.

India Alliance News
SBI Best FD Schemes: एसबीआयच्या या दोन FD योजना आहेत जबरदस्त, गुंतवणुकीवर इतका मिळतो व्याजदर

जेवणाचा मराठमोळा मेन्यू

तसेच इंडिया आघाडीचा कुठलाही जाहीरनामा नसेल. राष्ट्रीय पातळीवरील सहा मुद्यांवर इंडिया आघाडी आहे, त्यावर चर्चा होईल. 31 तारीखला मराठमोळ्या जेवणाची रेलचेल असणार आहे. पुरणपोळी, वडापाव, झुणका भाकर आदी महाराष्ट्रातील व्यंजन असणार आहे. ढोलताशा, लेझीम या पारंपरिक पद्धतीने नेत्यांचं स्वागत होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com